सीएसटीएम येथील हेरीटेज गॅलरीचा होणार विस्तार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) येथील मुख्यालयात असलेल्या हेरीटेज गॅलरीचा विस्तार करण्याची योजना मध्य रेल्वे आखत आहे. हेरीटेज गॅलरीमध्ये आणखी जागा वाढवून या ठिकाणी विविध कलाकृती, चित्रे आणि जुनी उपकरणे ठेवली जाणार आहेत.

२०१० मध्ये सुरू

हेरीटेज गॅलरीचे २०१० साली मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर बी. बी. मोडगील यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले होते. ही गॅलरी एकूण दीड हजार चौरस फुटांच्या जागेत पसरली असून गॅलरी बनविण्याकरीता २२ लाख रुपये खर्च आला होता.

हेरीटेज गॅलरीचे अॅप

मध्य रेल्वे नवी दिल्लीतील नॅशनल रेल म्युझिअमच्या अॅपप्रमाणे हेरीटेज गॅलरीचे अॅप आणण्याची योजना आखत आहे. तसंच, हे अॅप स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्समध्ये उपलब्ध असणार अाहे. या अॅपच्या माध्यमातून यूजर्सना रेल्वेचा इतिहास, बांधकामांची वैशिष्ट्ये याबाबत माहिती मिळणार आहे. त्याचप्रमाणे, ब्रिटिश-एरा इंजिन आणि इतर उपकरणे आणण्याची योजनाही आखली जात आहे.


हेही वाचा - 

रेल्वेची एटीव्हएम, मोबाइल तिकीट वेंडिंग मशीन कुचकामी

मालाड स्कायवाॅक सोमवारपासून ११ दिवसांसाठी बंद


पुढील बातमी
इतर बातम्या