Advertisement

मालाड स्कायवाॅक सोमवारपासून ११ दिवसांसाठी बंद

हा स्कायवाॅक दुरूस्तीसाठी रविवार १० डिसेंबरपासून २१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. दुरूस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर २२ डिसेंबरपासून स्कायवाॅक पादचार्यांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

मालाड स्कायवाॅक सोमवारपासून ११ दिवसांसाठी बंद
SHARES

मालाड रेल्वे स्थानकातील २ महत्त्वाच्या पादचारी पुलाला जोडणारा मालाड स्कायवाॅक सोमवारपासून पादचाऱ्यांसाठी पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. हा स्कायवाॅक दुरूस्तीसाठी रविवार १० डिसेंबरपासून २१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. दुरूस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर २२ डिसेंबरपासून स्कायवाॅक पादचार्यांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.


११ दिवस त्रास

मालाड रेल्वे स्थानकातील उत्तरेकडील पादचारी पूल आणि मध्यवर्ती पादचारी पूल अशा दोन महत्त्वाच्या पुलाला जोडणारा पूर्वेकडील असा हा मालाड स्कायवाॅक आहे. मालाड रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी आणि मालाड रेल्वे स्थानकावरून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी या स्कायवाॅकचा मोठा फायदा होतो. हा स्कायवाॅक बंद झाल्याने प्रवाशांना पुढचे ११ दिवस थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. कारण त्यांना मालाड रेल्वे स्थानकाला वळसा घालून जावं लागणार आहे.


जवानांची मदत

या काळात प्रवाशी-पादचाऱ्यांना मालाड उत्तरेकडील पादचारी पुलाचा वापर करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळं उत्तरेकडील पुलावर गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता रेल्वेने गर्दी व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिलं आहे. त्यासाठी रेल्वेनं महाराष्ट्र सुरक्षा बल आणि रेल्वे सुरक्षा बलाची मदत घेतली आहे. त्यानुसार या दोन्ही दलाचे जवान उत्तरेकडील पुलावर प्रवाशांच्या सोयीसाठी तैैनात राहतील, असंही रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.हेही वाचा-

नेरळ ते माथेरान प्रवास आता थंडाथंडा-कूलकूल

दुसऱ्या एसी लोकलसाठी करावी लागणार प्रतिक्षाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा