Advertisement

दुसऱ्या एसी लोकलसाठी करावी लागणार प्रतिक्षा

मुंबईत पहिली एसी लोकल २०१५ मध्ये आली. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये ही लोकल पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती. सुरुवातीच्या काळात या एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला.

दुसऱ्या एसी लोकलसाठी करावी लागणार प्रतिक्षा
SHARES

मुंबईकरांना दुसऱ्या एसी लोकलसाठी अाता मोठी प्रतिक्षा करावी लागणार अाहे. ही एसी लोकल २०१९ वर्षाअखेरीस पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लोकलमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. ही एसी लोकल मेट्रोसारखी दिसणार असून प्रवासी क्षमताही वाढवण्यात आली आहे. तसंच, प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या यंत्रणेवर देखील काम करण्यात आले आहे.


एसी सिस्टीममध्ये सुधारणा

मुंबईत पहिली एसी लोकल २०१५ मध्ये आली. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये ही लोकल पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती. सुरुवातीच्या काळात या एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. मात्र, तांत्रिक बिघाड आणि एसी सिस्टीमबाबत ही लोकल सतत चर्चेत राहिली आहे. त्यामुळं दुसऱ्या एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाडावर आणि एसी सिस्टीममध्ये सुधारणा करण्यात आली आहे.


आधुनिक ब्रेकिंग सिस्टीम 

 या एसी लोकलच्या दरवाजांमध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार या एसी लोकलचे दरवाजे बंद होण्यासाठी पहिल्या लोकलपेक्षा कमी वेळ घेणार आहेत. तसंच उत्तम दर्जाचे आसन आणि आधुनिक ब्रेकिंग सिस्टम असणार आहे.



हेही वाचा - 

डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे काढा लोकलचं तिकीट

अाता मुंबई ते पुणे प्रवास करा हेलिकाॅप्टरने




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा