अाता मुंबई ते पुणे प्रवास करा हेलिकाॅप्टरने

फ्लाय ब्लेड इंक भारतात मार्च २०१९ मध्ये अापली हेलिकाॅप्टर सेवा सुरू करणार अाहे. मुंबई अाणि पुणे दरम्यान ही सेवा प्रथम सुरू होत अाहे.

SHARE

लवकरच मुंबई ते पुणे प्रवास हेलिकाॅप्टरने करता येणार अाहे.  फ्लाय ब्लेड इंक ही अमेरिकन मुंबई-पुणे मार्गावर हेलिकाॅप्टर सेवा सुरू करणार अाहे.  फ्लाय ब्लेड इंक ही कंपनी अमेरिकेत नागरिकांना हेलिकाॅप्टर प्रवासाची सेवा उपलब्ध करून देते. 

 

शिर्डीपर्यंत सेवा

 फ्लाय ब्लेड इंक भारतात मार्च २०१९ मध्ये अापली हेलिकाॅप्टर सेवा सुरू करणार अाहे. मुंबई अाणि पुणे दरम्यान ही सेवा प्रथम सुरू होत अाहे. मुंबईतून जुहू अाणि महालक्ष्मी येथून हेलिकाॅप्टर उड्डाण करेल. मुंबई ते पुणे नंतर शिर्डीपर्यंत हेलिकाॅप्टरची सेवा दिली जाणार अाहे. 


३५ मिनिटांत पुणे

फ्लाय ब्लेड इंक ही अमेरिकन कंपनी दिल्ली स्थित गुंतवणूक कंपनी हंच बरोबर भागिदारी करून अमेरिकेच्या बाहेर भारतात हेलिकाॅप्टर सेवा सुरू करत अाहे. मुंबई ते पुणे या प्रवासाला हेलिकाॅप्टरने ३५ मिनिटे लागणार अाहेतहेही वाचा - 

अज्ञाताच्या दगडफेकीत तुतारी एक्स्प्रेसचा मोटरमन जखमी

डाॅ. आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे, बसची सोय
संबंधित विषय
ताज्या बातम्या