Advertisement

अज्ञाताच्या दगडफेकीत तुतारी एक्स्प्रेसचा मोटरमन जखमी


अज्ञाताच्या दगडफेकीत तुतारी एक्स्प्रेसचा मोटरमन जखमी
SHARES

मध्य रेल्वे मार्गावर धावत्या तुतारी एक्स्प्रेसवर अज्ञाताने दगड भिरकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत इंजिनची काच फुटून त्या काचेचा तुकडा मोटरमनच्या डोळ्यात घुसल्याने मोटरमन गंभीर जखमी झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून नाशिकच्या दिशेन निघालेल्या तुतारी एक्स्प्रेसवर वासिंद आणि आटगावच्या दरम्यान अज्ञाताकडून दगड भिरकावण्यात आला.


कधी घडली घटना?

मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास तुतारी एक्स्प्रेस नाशिककडे जात असताना हा प्रकार घडला. अज्ञाताने भिरकावलेला दगड मोठा असल्याने इंजिनची काच फूटून काचेचा तुकडा मोटरमनच्या डोळ्यात गेला. त्यामुळं मोटरमन गंभीर जखमी झाला आहे.


प्रसंगावधान राखलं

दरम्यान, मोटरमनने प्रसंगावधान राखून एक्स्प्रेस न थांबवता पुढे नेत कसारा रेल्वे स्थानकात थांबवली. कसारा स्थानकात मोटरमनवर प्रथमोपचार करण्यात आले आणि एक्स्प्रेस नाशिकडे रवाना झाली. मात्र, अद्याप अज्ञाताचं नाव समजलेलं नसून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा