डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे काढा लोकलचं तिकीट

‘क्रिस’ची ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर पश्चिम व मध्य रेल्वेला चाचणी करण्यास सांगण्यात येणार आहे. तसंच, मध्य रेल्वेन देखील अंमलबजावणीसाठी पुढाकारही घेतला आहे.

SHARE

भल्या मोठया रांगेत उभं राहून तिकीट काढण्याचा प्रवाशांचा त्रास आता वाचणार आहे. कारण प्रवाशांना लवकरच डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे लोकलचे तिकीट काढता येणार आहे. डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे तिकीट काढण्यासाठी एटीव्हीएमलाच पीओएस (पॉइंट ऑफ सेल) यंत्र लावण्यात येणार आहे. त्यामुळे एटीव्हीएममधून तिकीट काढण्यासाठी स्मार्ट कार्डची गरज लागणार नाही.


प्रवाशांच्या सोईसाठी

मध्य रेल्वेवरील स्थानकात काही वर्षांपूर्वी एटीव्हीएम लावण्यात आले होते. या एटीव्हीएममधून स्मार्ट कार्डद्वारे प्रवाशांना तिकीट काढता येतं. सध्या प्रवाशांकडे डेबिट आणि क्रेडिट कार्ड असल्यामुळे या मशीनमधून डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे तिकीट काढता येईल का, यासाठी रेल्वेच्या ‘क्रिस’ने (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम) संबंधित कंपनीशी चर्चा करून चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.


चाचणी यशस्वी

‘क्रिस’ची ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर पश्चिम व मध्य रेल्वेला चाचणी करण्यास सांगण्यात येणार आहे. तसंच, मध्य रेल्वेन देखील अंमलबजावणीसाठी पुढाकारही घेतला आहे. दरम्यान, सुरुवातीला ज्या स्थानकांत मोठ्या प्रमाणात गर्दी असते, अशा स्थानकांतील एटीव्हीएमवर ही सुविधा देण्यासाठी नियोजन केलं जात आहे.


चर्चा सुरू

एटीव्हीएममध्ये पीओएस मशीन बसवण्यासाठी संबंधित कंपनीने जास्त रक्कम मागितली आहे. तसंच यावर चर्चा देखील करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच ही सुविधा प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याचे म्हटलं जातं आहे.हेही वाचा- 

अाता मुंबई ते पुणे प्रवास करा हेलिकाॅप्टरने

अज्ञाताच्या दगडफेकीत तुतारी एक्स्प्रेसचा मोटरमन जखमीसंबंधित विषय
ताज्या बातम्या