Advertisement

नेरळ ते माथेरान प्रवास आता थंडाथंडा-कूलकूल

मिनी ट्रेनकडे आणखी प्रवाशांना वळवण्याकरता मध्य रेल्वेनं मिनी ट्रेनला पारदर्शक एसी डबा जोडला आहे. शनिवारपासून हा डबा जोडण्यात आला असून त्याला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

नेरळ ते माथेरान प्रवास आता थंडाथंडा-कूलकूल
SHARES

नेरळवरून माथेरानला मिनी ट्रेनने जाण्याची मजा काही औरच. या मजेत आता आणखी भर पडणार आहे. कारण नेरळ ते माथेरान हा प्रवास थंडाथंडा-कूलकूल झाला आहे. शनिवारपासून नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनला एसी पारदर्शक डबा जोडण्यात आला. यामुळे आकर्षक सजावट केलेल्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता.


आकर्षणाचं केंद्र

थंड हवेचं ठिकाण म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये हजारोंच्या संख्येनं पर्यटक येतात. या पर्यटकांचं मुख्य आकर्षण असतं ते माथेरानची मिनी ट्रेन. मिनी ट्रेनमध्ये बसून माथेरानच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्याकडे पर्यटकांचा मोठा कल असतो.

त्यामुळेच मिनी ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. मिनी ट्रेनकडे आणखी प्रवाशांना वळवण्याकरता मध्य रेल्वेनं मिनी ट्रेनला पारदर्शक एसी डबा जोडला आहे. शनिवारपासून हा डबा जोडण्यात आला असून त्याला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.


शनिवार-रविवारच्या फेऱ्याही वाढल्या

विकेंड सेलिब्रेशनसाठी माथेरानाला विशेष महत्त्व दिलं जातं. मुंबई, ठाणे आणि आसपसाच्या पर्यटकांची संख्या विकेंडला अधिक असते. हीच बाब लक्षात घेत शनिवार-रविवारी होणारी गर्दी हाताळण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवार-रविवारसाठी मिनी ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. त्याचाही फायदा आता विकेंडला येणाऱ्या पर्यटकांना होणार आहे. दरम्यान मिनी ट्रेनच्या एसी पारदर्शक डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी प्रवाशांना प्रत्येकी ४१५ रूपये मोजावे लागतील.



हेही वाचा-

माथेरानच्या मिनी ट्रेनला लवकरच पारदर्शक डबा

माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा ट्रॅकवरून घसरली



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा