Advertisement

माथेरानच्या मिनी ट्रेनला लवकरच पारदर्शक डबा


माथेरानच्या मिनी ट्रेनला लवकरच पारदर्शक डबा
SHARES

माथेरानच्या मिनी ट्रेनला एसी डब्यासह व्हिस्टाडोम (पारदर्शक) डबाही जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. प्रवाशांना नुतन वर्षात या डब्यातून प्रवास करता येणार आहे.


आता पारदर्शक डबा जोडणार 

माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना मिनी ट्रेनचं आकर्षण आहे. त्यामुळे, प्रवाशांचा आणखी चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी या मिनी ट्रेनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, या मिनी ट्रेनला एक पारदर्शक (व्हिस्टाडोम) डबाही जोडण्याचं नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे. २०१९ मध्ये हा डबा जोडण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.


एसी डबाही जोडणार

माथेरानमध्ये येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी या मिनी ट्रेनला १६ आसनी असलेला एक एसी डबाही लवकरच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मिनी ट्रेनच्या एसी आणि पारदर्शक डब्यातून प्रवास करण्यास कधी मिळणार? याची उत्सुकता प्रवाशांना लागली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा