दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेच्या ३८ विशेष गाड्या

मध्य रेल्वेमार्गावर प्रत्येक सणासाठी विशेष गाड्या सोडल्या जात असतात. यंदाही प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळीनिमित्त ३८ विशेष गाड्या मध्य रेल्वेतर्फे सोडण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते पाटणा-नागपूर, एलटीटी ते सावंतवाडी, साईनगर शिर्डी, थिविम आणि पुणे ते मनधुद या मार्गावर या गाड्या धावणार आहेत.

कोकणातही गाड्या

  •  ५ ते १९ नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी रात्री १.१० वाजता ०१०३७ एलटीटी-सावंतवाडी विशेष गाडी सुटणार असून दुपारी १.२० वाजता ही गाडी सावंतवाडी स्थानकात पोहोचणार आहे.
  •   ५ ते १९ नोव्हेंबर दरम्यान दर दुपारी २.१० वाजता ०१०३८ सावंतवाडी-एलटीटी विशेष गाडी सुटणार असून दुसऱ्या दिवशी रात्री १२.२० वाजता एलटीटी स्थानकात पोहचणार आहे.
  • २ ते १६ नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी रात्री १.१० वाजता ०१०४५ एलटीटी-थिविम विशेष गाडी सुटणार असुन दुपारी १.५० वाजता थिविम स्थानकात पोहचणार आहे.

नागपूर ते शिर्डी 

  •  ८ ते २२ नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी रात्री ११.५५ वाजता ०२०३१ सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी सुटणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता नागपूरला पोहोचणार आहे.
  •  ८ ते २२ नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी रात्री १२.४५ वाजता ०११३५ एलटीटी ते साईनगर शिर्डी विशेष गाडी सुटणार असून सकाळी ७.३० वाजता साईनगर शिर्डी येथे पोहचणार आहे.
  •  २ ते १६ नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी दुपारी २.२० वाजता ०२०५३ सीएसएमटी ते पाटणा सुपरफास्ट गाडी सुटणार आहे.

हेही वाचा -

एसी लोकलच्या तिकीट विक्रीत वाढ

नवं दादर हिरकणी बसस्थानक मंगळवारपासून सेवेत


पुढील बातमी
इतर बातम्या