आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार? सरकार करतंय पुनर्विचार

आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याच्या निर्णयावर सरकार पुनर्विचार करत आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या स्ट्रेननंतर सरकार अधिक खबरदारी घेत आहे. यापूर्वी १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करणार होती.

पण नवा स्ट्रेन आढळल्यानंतर अधिक खबरदारी घेतली जात आहे. विशेषत: 'ओमिक्रॉन' रुग्ण आढळलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचणी आणि पाळत ठेवण्यासाठी काही कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.

एका अधिकृत प्रवक्त्यानं सांगितलं की, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जवळपास २० महिन्यांच्या कालावधीनंतर, केंद्रानं, शुक्रवार, २६ नोव्हेंबर रोजी, १५ डिसेंबरपासून नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. केंद्र आता जागतिक परिस्थितीनुसार उड्डाणांच्या नियोजित तारखेचे पुनरावलोकन करणार आहे.

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी नवीन नियम जाहीर केले होते. ज्यामध्ये प्रवाशांची चाचणी आणि विलगीकरण केलं जाईल.

दुसरीकडे, बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC)नं महाराष्ट्र कोविड-१९ टास्क फोर्सकडून नव्या स्ट्रेनबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मागवली आहे. त्यांनी टास्क फोर्सला युरोप, यूएसए आणि रशियामधून उड्डाण करणाऱ्या प्रवाशांचे जीनोम सिक्वेन्सिंग अहवाल गोळा करण्यासही सांगितलं आहे.


हेही वाचा

...नाहीतर बेस्ट बसमध्ये नो एन्ट्री, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धस्का

१ डिसेंबरपासून सीएसएमटी ते पनवेल मार्गावर धावणार एसी लोकल

पुढील बातमी
इतर बातम्या