Advertisement

...नाहीतर बेस्ट बसमध्ये नो एन्ट्री, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धस्का

बेस्ट बसनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार बेस्टन प्रवास करणाऱ्यांकडे ही गोष्ट असणे बंधनकारक आहे.

...नाहीतर बेस्ट बसमध्ये नो एन्ट्री, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धस्का
SHARES

बेस्ट बसनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. २९ नोव्हेंबर म्हणजे आजपासून बेस्ट प्रवासासाठी लशीचे दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. दक्षिण आफिक्रेच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनानं खबरदारी घेत हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

लोकलनंतर आता बेस्टमध्येही प्रवास करायचा असल्याचं लस घेतल्याचं प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आलं आहे. लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस झाले असतील तरच बेस्ट बसमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. याशिवाय मास्क वापरणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.

लोकल रेल्वे, बेस्ट बस, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस, मेट्रो, मोनो रेलसह स्थानिक परिवहन सेवांच्या बसमध्ये लसीकरण झालेल्यांनाच मास्कसह प्रवेश देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर बेस्ट प्रवाशनानंही लसीकरण सक्तीचं केलं आहे.

बेस्ट प्रशासनानं सांगितलं की, 'मुंबईत अनेक ठिकाणी बस सुरू होण्याआधीच प्रवाशांना तिकिट दिलं जातं. तिकिट देताना आजपासून लसीकरण प्रमाणपत्र पाहिलं जाईल. प्रत्येकाला कोविन अॅपवर आपलं लस घेतल्याचं प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.'

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धास्तीमुळं शाळा सुरु करण्याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशी चर्चा करणार आहेत. त्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.



हेही वाचा

COVID-१९च्या 'या' सुधारीत मार्गदर्शक नियमांबद्दल जाणून घ्या

१ डिसेंबरपासून सीएसएमटी ते पनवेल मार्गावर धावणार एसी लोकल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा