Advertisement

COVID-१९च्या 'या' सुधारीत मार्गदर्शक नियमांबद्दल जाणून घ्या

कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळल्यानं सरकारनं नवीन गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत.

COVID-१९च्या 'या' सुधारीत मार्गदर्शक नियमांबद्दल जाणून घ्या
SHARES

शनिवारी, २७ नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र सरकारनं काही अटींसह आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील नियम काही अटींसह शिथिल केले. तसंच पूर्णपणे लसीकरण आणि कोविडचे नियम पाळण्यावर अधिक भर दिला.

5 पानांच्या आदेशात, सरकारनं जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत:

१) प्रवास मार्गदर्शक तत्त्वे

  • केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांनाच सार्वजनिक वाहतुकीच्या सर्व मार्गांनी प्रवास करण्याची परवानगी असेल.
  • कोणत्याही आंतरराष्‍ट्रीय ठिकाणाहून महाराष्ट्रात येणाऱ्यांना केंद्र सरकारच्‍या नियमांनुसार राहावं लागेल.
  • देशांतर्गत प्रवशांचं पूर्णपणे लसीकरण करणं आवश्यक आहे. त्यांनी ७२ तासांच्या वैधतेसह RT-PCR चाचणी अहवाल सोबत बाळगणं आवश्यक आहे.
  • बस किंवा टॅक्सी सारख्या सार्वजनिक वाहतुकीत विना मास्क किंवा लस न घेता प्रवास करणाऱ्यांना चालक, कंडक्टर इत्यादींसह ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल.
  • ऑपरेटरना १०,००० दंड भरावा लागेल किंवा आपत्ती नियम लागू होईपर्यंत त्यांचा परवाना काढून घेतला जाईल.

२) मॉल आणि खुल्या जागेतील मार्गदर्शक तत्त्वे

  • मॉल्स, दुकाने, लोकल, बस, सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम इत्यादींमध्ये केवळ पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांनाच प्रवेश दिला जाईल.
  • आयोजकांनी देखील पूर्णपणे लसीकरण केलं पाहिजे.
  • पूर्वीप्रमाणेच, चित्रपटगृहे, विवाहसोहळे इत्यादींसाठी केवळ ५०% उपस्थितीची परवानगी असेल.
  • ओपन-टू-स्काय स्थळांमध्ये, क्षमतेच्या २५% पर्यंत परवानगी असेल.
  • एकूण उपस्थिती १००० पेक्षा जास्त असल्यास, आयोजकांनी कोविड योग्य वर्तन (CAB) चं पालन सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) ला सूचित करणं आवश्यक आहे. उल्लंघन केल्यास, तो भाग किंवा पूर्ण स्थळ बंद करण्याचे आदेश देऊ शकतात.

३) इतर काही मार्गदर्शक तत्त्वे

  • सर्वांनी कोविड-19 चे योग्य वर्तन जसे की फेस मास्क परिधान करणे आणि कमीतकमी ६ फूट शारीरिक अंतर राखणं आवश्यक आहे.
  • नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्यात येईल.
  • संपूर्ण लसीकरणाच्या स्थितीसाठी सरकारनं दिलेला युनिव्हर्सल पास हा वैध पुरावा असेल.
  • कोणतीही संस्था किंवा आस्थापना नियमांचं पालन करण्यात अयशस्वी झाल्यास ५०००० दंड आकारला जाईल.



हेही वाचा

१३ देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन सक्तीचं- राजेश टोपे

मुंबई महापालिकेच्या प्लांटमधून दिवसाला १५०० ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा होणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा