Advertisement

मुंबई महापालिकेच्या प्लांटमधून दिवसाला १५०० ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा होणार

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी नवा जंबो ऑक्सिजन प्लांट लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या प्लांटमधून दिवसाला १५०० ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा होणार
SHARES

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी नवा जंबो ऑक्सिजन प्लांट लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

भारत पेट्रोलियम आणि मुंबई महापालिकेच्यावतीनं लवकरच माहुल परिसरात सुरू करण्यात येणार आहे. या ऑक्सिजन प्लांटमधून दिवसाला सुमारे १५०० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने मिशन ऑक्सिजनची घोषणा करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून कंपन्यांना ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत भारत पेट्रोलियम कंपनीने मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने या जंबो ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीला ३ महिन्यांपूर्वी सुरुवात केली असून लवकरच हा प्लांट सुरू केला जाणार आहे.

प्लांटमधून मुंबईतील मोठ्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. आरसीएफ कंपनीनं गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू केला आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी माहुल येथील कामाचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेचे अधिकारी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

  • माहुल, चेंबूर इथं पालिकेच्या जागेवर प्लांट उभारण्यात आला आहे.
  • व्ही पी एस ए टेक्नॉलॉजीद्वारा ऑक्सिजन निर्मिती
  • भारत पेट्रोलियमच्यावतीने एक आणि पालिकेच्यावतीने दोन ऑक्सिजन कॉम्प्रेसर यंत्रणा बसविण्यात आली आहे.
  • प्रकल्पाचा खर्च अंदाजे १५ कोटी रुपये
  • १४ लीटरचा एक याप्रमाणे तासाला सुमारे ५० सिलिंडर
  • दिवसाला सुमारे १५०० सिलिंडरचा पुरवठा
  • लोकमान्य टिळक रुग्णालय आणि इतर मोठ्या रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा