बेस्टचे तब्बल ५७ कामगार बडतर्फ, कामावर अनुपस्थित राहिल्याने कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळं सर्वच सुविधा, वाहतूक सेवा बंद होत्या. मात्र, लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्टनं आपली वाहतूक सेवा सुरु ठेवली होती. तसंच, कर्मचाऱ्यांना सेवेसाठी हजेरी लावण्याचं आवाहन केलं होतं. परंतु, अनेकांनी हजेरी लावली नाही. त्यामुळं बेस्ट उपक्रमानं तब्बल ५७ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं असून, सुमारे ४ हजार कामगारांना नोटीसही बजावण्यात आली आहे. 

बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेत हजर राहण्याचे बंधन न पाळणाऱ्या ५७ कामगारांना आतापर्यंत बडतर्फ केले. त्याचवेळी, आतापर्यंत सुमारे ४ हजार कामगारांना नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक भरणा हा चालक, कंडक्टर यांचा आहे. मात्र ही कारवाई अयोग्य असून कामगारांवर करण्यात येणारी कारवाई मागे घेण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्टनं विशेष सेवा चालविल्या होत्या. त्यासाठी कामगारांना कामावर येण्याची सूचना केली होती. परंतु काही कारणांनी अनेक कामगार हजर राहू शकले नव्हते. ते लक्षात घेत उपक्रमाने नुकतीच कारवाई हाती घेतली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या कारवाईची तीव्रता वाढविण्यात आली आहे.

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करताच बेस्टने सर्वांसाठी बससेवा खुली केली. त्यामुळे, बससेवांची संख्या वाढून मुंबईकरांनाही त्याचा फायदा झाला. मात्र, या सर्व कालावधीत सेवा न बजावू शकणाऱ्या कामगारांविरोधात उपक्रमाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे.

कोरोनानं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना टार्गेट केलं असून, आतापर्यंत बेस्टच्या सुमारे ८०० कामगारांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त कामगार कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा - 

University Exams 2020: अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच! राज्य सरकार निर्णयावर ठाम

मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा धावणार डबल डेकर बस


पुढील बातमी
इतर बातम्या