मध्य रेल्वेकडून (Central Railway) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथे सुरू असलेल्या पुनर्विकास कामांमुळे मोठा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा ब्लॉक 29 मे 2026 पासून सुरू होणार असून पुढील 10 दिवस लागू राहणार आहे. त्यामुळे CSMT ला येणाऱ्या आणि येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवाशांना तात्पुरता त्रास सहन करावा लागू शकतो.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 वर पायाभूत सुविधा आणि आधुनिकीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. ही कामे Rail Land Development Authority मार्फत राबवण्यात येणाऱ्या मोठ्या स्टेशन पुनर्विकास प्रकल्पाचा भाग आहेत. भविष्यात प्रवासी सुविधा आणि रेल्वे संचालन अधिक सक्षम करण्यासाठी ही कामे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, या काळात अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. काही गाड्या CSMT पर्यंत न जाता दादर आणि ठाणे येथेच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत.
दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत:
12112 अमरावती–CSMT एक्सप्रेस
11002 बल्लारशाह–CSMT नंदीग्राम एक्सप्रेस
12810 हावडा–CSMT एक्सप्रेस
11020 भुवनेश्वर–CSMT कोणार्क एक्सप्रेस
22144 बिदर–CSMT एक्सप्रेस
22108 लातूर–CSMT एक्सप्रेस
22120 मडगाव–CSMT तेजस एक्सप्रेस
तसेच 12134 मंगळुरू–CSMT एक्सप्रेस ही गाडी पुनर्विकास काळात ठाणे येथेच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासून घ्यावे तसेच CSMT येथे चढणाऱ्या किंवा उतरणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी प्रवास व्यवस्था करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
CSMT पुनर्विकास प्रकल्प हा मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या स्टेशनचे आधुनिकीकरण करण्याच्या मोठ्या योजनेचा भाग आहे. कामांदरम्यान काही अडचणी येणार असल्या तरी भविष्यात स्टेशनची पायाभूत सुविधा, प्रवासी हालचाल आणि सुविधा अधिक सुधारण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा