मोटरमनचा संप अखेर मागे, मरेच्या ७९ फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेच्या मोटरमननी ओव्हरटाइम करण्यास नकार देत पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात अाला अाहे. पण अापल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या या संपामुळे एेन गर्दीच्या वेळीस मध्य रेल्वेच्या ५ वाजेपर्यंत ७९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळं रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. बराच वेळ लोकल नसल्याने मध्ये रेल्वेच्या दादर स्थानकावरील फलाट १ अाणि २ वरील पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. जिन्यावरून कुणालाही चढता अाणि उतरताही येत नव्हते.

स्थानकांवर प्रवाशांची गर्दी 

रेल्वे प्रशासनासोबत बैठकीत तोडगा निघाल्याने शुक्रवारी मोटरमनी केलेला संप मागे घेतला अाहे. मोटरमननी ओव्हरटाईम करण्यास नकार दिल्यामुळं मध्य रेल्वे मार्गावर सकाळी गर्दीच्या वेळी ६, हार्बर मार्गावर ६ अाणि ट्रान्स हार्बर मार्गावरही ६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तसंच मधल्या काळात एकूण ६१ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्ये रेल्वे मार्गावर दिवसभरात १०७४ लोकल फेऱ्या होतात. 

मात्र, मोटरमनच्या आंदोलनामुळं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत १०७४ पैकी ७९ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. सीएसएमटी ते भायखळा स्थानकादरम्यान लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळं रेल्वे प्रवाशांनी रुळावर उतरून प्रवास केला. तसंच, १५ ते २० मिनीट उशिरानं लोकल धावत असल्यामुळं स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.


हेही वाचा -

मध्य रेल्वेच्या 9 फेऱ्या रद्द, पण का? वाचा...

रेल्वे डब्यात जाणीवपूर्वक टाकली विष्ठा, प्रवाशी घाण वासाने बेजार


पुढील बातमी
इतर बातम्या