Advertisement

मध्य रेल्वेच्या 9 फेऱ्या रद्द, पण का? वाचा...

शुक्रवारी सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने असून आतापर्यंत 9 लोकल गाड्यांच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या 9 फेऱ्या रद्द, पण का? वाचा...
SHARES

'ओव्हरटाईममुळे कामाचा ताण वाढत आहे...त्यामुळे आम्ही ओव्हरटाईम करणार नाही', असं मोटरमनने स्पष्ट केल्यानंतर मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. शुक्रवारी सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने असून आतापर्यंत 9 लोकल गाड्यांच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.


9फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेच्या मोटरमननी ओव्हरटाईम करण्यास नकार देत आपल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. परिणामी लोकलच्या 9 फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचा मनस्ताप वाढला.

वेळोवेळी मागण्या करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मध्य रेल्वच्या मोटरमन प्रतिनिधींनी केला आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास शुक्रवारी  10 ऑगस्टपासून ओव्हरटाईम न करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.



बैठक निष्फळ

याबाबत गुरुवारी रात्री मोटरमन प्रतिनिधी आणि मध्य रेल्वे प्रशासनामध्ये बैठक पार पडली. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याने मोटरमननी आंदोलन सुरू केलं आहे. याचाच परिणाम मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर झाल्याने चाकरमान्यांना सकाळी सकाळी मनस्ताप सहन करावा लागला.


'रिक्त पदे भरा'

मध्य रेल्वेतील 229 मोटरमनची पदे रिक्त असल्याने ड्युटीवर असलेल्या मोटरमनला अतिरिक्त काम करावं लागतं. या कामाचा त्यांच्यावर ताण येत आहे. तेव्हा ही रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी रेल्वे कामगार संघटनेने मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे. याच मागणीच्या पुर्ततेसाठी 10 ऑगस्ट पासून मध्य रेल्वेच्या मोटरमनने ओव्हरटाईम करण्यास नकार दिला आहे. त्याचा मध्य रेल्वेला चांगलाच फटका बसला आहे. 

मध्य रेल्वेच्या सकाळी 8 ते 9 च्या दरम्यानच्या 9 लोकलफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. लोकल ट्रेन सुरक्षितपणे चालवण्यासाठी मोटारमनला आधीच विशेष काळजी घ्यावी लागते. सिग्नलवर लक्ष देण्याबरोबरच रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवरसुद्धा लक्ष देत गाडी चालवावी लागते. एवढं करूनसुद्धा रेल्वे प्रशासनाकडून त्यांना वाईट वागणूक दिली जाते. सिग्नल चुकवल्यास ड्युटीवरून काढून टाकण्यात येतं. मात्र रिक्त जागांमुळे मोटरमन दबावाखाली काम करत आहे. ज्याचा परिणाम त्यांच्या कामावर होते आहे. 

- कुमार चंद्रांनी, कार्यवाहक अध्यक्ष, सीआरएमएस


हेही वाचा -

रेल्वेला महाराजांचा विसर: अशुद्ध मराठी लिहिताना सीएसटी म्हणूनच उल्लेख

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा