मुंबई मोनोरेलमध्ये 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव मुंबई मोनोरेलच्या वडाळा ते चेंबूर दरम्यानच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. वडाळा ते चेंबूर दरम्यानच्या मार्गिकेवरील सेवा ही दुपारी २ वाजेपर्यंत खंडीत राहिल.
त्यामुळे २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस मोनोरेल सेवा प्रभावित असेल. त्यामुळे मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.