Advertisement

पश्चिम रेल्वेवर 27 नोव्हेंबर नाही, तर 'या' तारखेपासून ब्लॉक

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 27 नोव्हेंबरपासून ब्लॉक घेतला जाणार नाही आहे.

पश्चिम रेल्वेवर 27 नोव्हेंबर नाही, तर 'या' तारखेपासून ब्लॉक
SHARES

पश्चिम रेल्वेकडून पुन्हा एकदा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. 27 नोव्हेंबरपासून हा ब्लॉक घेतला जाणार अशी चर्चा होती. पण यावर रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे. ब्लॉक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे, असे रेल्वेने म्हटले आहे. 

अंधेरी स्टेशन परिसरातील गोखले पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरात लवकर पुल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. पुलाच्या कामासाठी महापालिकेने रेल्वेला ब्लॉक घेण्याची विनंती केली होती. रेल्वेने ही विनंती मान्य करुन पुलाच्या कामासाठी ब्लॉक घोषित केला आहे. गोखले पुलाचा एक महत्त्वाच्या गर्डर उभारणीच्या कामासाठी ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक हा रात्रकालीन असून रोज तीन चे चार तासांसाठी ब्लॉक घेण्यात येईल. रेल्वेकडून काहीच दिवसांत ब्लॉक शेड्युल केल्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये पुलाचा उत्तरेकडील गर्डर उभारण्यात आल्यानंतर आता दक्षिणेकडील गर्डर उभारण्यात येणार आहे. 



मध्य रेल्वेने 'या' लांब पल्ल्याच्या ३० गाड्यांचा वेग वाढवला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा