लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ, फेऱ्या मात्र कमीच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानं लोकल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ३ महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली. या लोकलमधून सुरुवातील काहीच प्रवाशांना प्रवास मुभा होती. दरम्यान, असं असलं तरी या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतला त्यांच्या तुलनेत लोकल फेऱ्या कमी पडत आहेत.

लॉकडाऊननंतर लोकल सेवा सुरू करताना मध्य व पश्चिम रेल्वेनं अडीच लाख प्रवासी संख्या असेल, असा विचार करत मध्य रेल्वेने २०० आणि पश्चिम रेल्वेने २०२ लोकल फेऱ्यांचे नियोजन केलं. ३० जूनपर्यंत पश्चिम रेल्वेवर ८६,१६९ आणि मध्य रेल्वेवर ५४,१८७ प्रवासी संख्या होती. प्रवासीसंख्या वाढली तरी रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या न वाढल्याने कार्यालयीन वेळेत अत्यावश्यक सेवेत असलेल्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे.

१ जुलैपासून अन्य काही शासकीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा दिली. म्हणून पश्चिम रेल्वेनं आणखी १४८ आणि मध्य रेल्वेवर १५० फेऱ्या चालविण्याचे ठरविले. या दोन्ही मार्गावर प्रत्येकी ३५० लोकल फेऱ्या धावत आहेत. २ जुलैला पश्चिम रेल्वेवर प्रवाशांची संख्या १ लाख तर मध्य रेल्वेवरील प्रवाशी संख्या ६४ हजार होती.

सप्टेंबर महिन्यापासून सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ करण्यात आली. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली. पश्चिम रेल्वेवरून १५ सप्टेंबरला २,२५,६९२ प्रवाशांनी लोकल प्रवास केला, तर मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दीड लाखावर गेली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या