मुंबईत बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप, 'हे' आहे कारण

एसटी नंतर आता मुंबईत बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मुंबईच्या वडाळा, कुर्ला आणि वांद्रे आगारातील कंत्राटी तत्त्वावर कामाला असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी (BEST employees) गुरुवारी अचानकपणे काम बंद केले. त्यामुळे बेस्टच्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता.

बेस्टच्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. मात्र, याचा फटका प्रवाशांना बसला. पण बसेस आता पूर्वपदावर आल्या आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.

दादर रेल्वे स्थानकाजवळून टाटा, केईएम रुग्णालय मार्गे जाणाऱ्या बेस्ट बस बंद असल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंपनीला याबाबत कळवण्यात आले आहे. त्यानंतर कंत्राटी कंपनीचे अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलत आहेत. मात्र, या वादावत अद्याप तोडगा निघालेला नाही.

कंत्राटी बेस्ट प्रशासनानं बेस्टचे इतर नियमित कर्मचारी आणून बेस्ट सेवा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

कंत्राटी कामगारांनी सांगितलं की, कंपनीचे जे प्रतिनिधी आमच्याशी संवाद साधायला येतात ते आमच्याशी व्यवस्थित संवाद करत नाहीत. आमचा पगार दिलेल्या तारखेला होत नाही. आम्ही सगळे कामगार आहोत. आम्ही मोठ्या कष्टाने काम करतो. बेस्टकडून मिळणाऱ्या पगारावर आमचे घर चालते, आमच्या घरी येऊन परिस्थिती बघा.


हेही वाचा

MSRTC Strike Row: 'इतके' एसटी कर्मचारी कामावर परतले

बेस्टच्या ताफ्यात लक्झरी बसेसचा समावेश, मर्सिडीज, व्होल्वोच्या नावांची चर्चा

पुढील बातमी
इतर बातम्या