Advertisement

बेस्टच्या ताफ्यात लक्झरी बसेसचा समावेश, मर्सिडीज, व्होल्वोच्या नावांची चर्चा

प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर करण्यासाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन ही योजना आखत आहे.

बेस्टच्या ताफ्यात लक्झरी बसेसचा समावेश, मर्सिडीज, व्होल्वोच्या नावांची चर्चा
SHARES

मुंबई बेस्ट बसच्या ताफ्यात लवकरच मर्सिडीज-बेंझ, स्कॅनिया आणि व्होल्वो या लक्झरी बसेसचा समावेश होण्याची शक्यता आहे. या वातानुकितील बसेस असतील. प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर करण्यासाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन ही योजना आखत आहे.

बोरिवली आणि ठाणे या पश्चिम आणि पूर्व उपनगरांपासून सुरू होऊन दक्षिण मुंबईत जाणाऱ्या या बसेस निश्चित मार्गांवर चालतील आणि त्यांना मर्यादित थांबे असतील. बेस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अंतर्गत चर्चा सुरू आहे. या सिंगल-डेकर एसी लक्झरी बसेसची किंमत १.५-२ कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल.

“आम्ही वेगवेगळ्या श्रेणीतील ग्राहकांसाठी टॉप-एंड लक्झरी बसेस सादर करण्याच्या योजनांवर काम करत आहोत. आम्ही या बसेस अॅप-आधारित बस आणि कॅब ऑपरेटर्सद्वारे पुरवलेल्या मार्गांवर चालवू इच्छितो आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. हे भाडे साहजिकच नेहमीच्या भाड्यापेक्षा जास्त असेल. आम्ही यासाठी कॉर्पोरेट संस्थांशी करार करण्याचा विचार करत आहोत,” असं नाव न सांगण्याच्या अटीवर बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं फ्री प्रेस जनरलला सांगितलं.

या बसेस सध्या शहरांतर्गत मार्गांवर धावणाऱ्या लक्झरी बसेससारख्या असतील. हेडरेस्ट्स व्यतिरिक्त, प्रत्येक सीटवर लॅपटॉप आणि मोबाइल चार्जिंग पॉइंट असतील, बाटलीबंद पाणी उपलब्ध असेल.

महत्त्वाचं म्हणजे, उपनगरे आणि शहरादरम्यान मर्यादित थांबे असतील. हे थांबे मार्ग, प्रवाशांची संख्या यांवर अधारीत असतील. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वरळी, नरिमन पॉइंट, लोअर परळ आणि प्रभादेवी या सारख्या ठिकाणी थांबे दिले जातील.

पूर्व उपनगरातील ठाणे, मुलुंड आणि घाटकोपर आणि पश्चिम उपनगरात बोरिवली, गोरेगाव आणि अंधेरी येथून सुरुवातीची ठिकाणे असण्याची शक्यता आहे. तथापि, पिक-अप आणि ड्रॉप पॉइंट्स मागणीवर अवलंबून असतील.

अॅप-आधारित बस ऑपरेटर वेगवेगळ्या मार्गांवर काम करतात, ठाणे आणि नवी मुंबईतील निवासी केंद्रांना व्यावसायिक आणि ऑफिस हबशी जोडतात.



हेही वाचा

रिंग रूट्सवर धावणाऱ्या सर्व बसेसमध्ये कार्ड रीडर बसवण्यात येणार

मुंबई ते गुजरात "या" ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच सुरू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा