Advertisement

रिंग रूट्सवर धावणाऱ्या सर्व बसेसमध्ये कार्ड रीडर बसवण्यात येणार

बेस्ट लवकरच संपूर्ण मुंबईतील ‘रिंग रूट’वर धावणाऱ्या सर्व बसमध्ये कार्ड रीडर बसवण्याची योजना आखत आहे.

रिंग रूट्सवर धावणाऱ्या सर्व बसेसमध्ये कार्ड रीडर बसवण्यात येणार
SHARES

बेस्ट लवकरच संपूर्ण मुंबईतील ‘रिंग रूट’वर धावणाऱ्या सर्व बसमध्ये कार्ड रीडर बसवण्याची योजना आखत आहे. जवळपास ६०० वातानुकूलित बसेस आहेत ज्यात मिनी आणि टेम्पो बसेसचा समावेश आहे. या बसेस रिंग रुटवर धावतात. या बसेस १७४ मार्गांवर धावतात ज्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांपासून मुंबईतील विविध ठिकाणी निवासी भागात नेतात.

बेस्टच्या सूत्रांनी सांगितलं की, या रिंग रूट्सवरून प्रवास करणाऱ्या लोकांना आता कंडक्टरची वाट पाहण्याची गरज पडू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

रिंग रूटवर धावणाऱ्या या बसेस एकतर एसी बससाठी ६ रुपये आणि नॉन एसी बससाठी ५ रुपये निश्चित भाडे आकारतात. बसेसमध्ये रीडर मशिन असतील जी NCMC कार्ड आणि चलो मोबाईल अॅपवर खरेदी केलेली तिकिटे दोन्ही वाचू शकतील. प्रवाशांना बोर्डिंग करताना फक्त एकदाच टॅप करावे लागेल.

“प्रवाश्यांना बसच्या प्रवेशद्वाराजवळ बसलेल्या कार्ड रीडरवर टॅप करणे आवश्यक आहे. रिंग रूट्सचा कॉरिडॉर निश्चित झाल्यामुळे आम्ही ही प्रणाली इथं सुरू करण्यावर काम करत आहोत,” असं बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

या कार्ड रीडर मशिन्स पुरवण्यासाठी बेस्टचे अधिकारी लवकरच खासगी कंत्राटदारांच्या निविदा मागवणार आहेत. सूत्रांनी सांगितलं की, योजना आता प्रगत टप्प्यात आहेत आणि त्यांना आशा आहे की येत्या काही महिन्यांत ते बसमध्ये कार्ड रिडर सेवा सुरू करतील.

गेल्या अनेक महिन्यांपासून कंडक्टर बस येण्यापूर्वी स्टॉपवर उभ्या प्रवाशांकडून तिकिट काढतात. निवडक ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्या काळात बसचालक बस थांबवत असत. त्यामुळे प्रवासाला उशीर होत असे. कार्ड रीडर्समुळे, प्रवास अधिक सुलभ होईल.



हेही वाचा

मुंबई ते गुजरात "या" ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच सुरू

विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना 'अशी' अद्दल घडवणार मुंबई ट्राफिक पोलिस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा