Harbour Local News: हार्बर रेल्वेसेवा विस्कळीतच, वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं

सकाळी सकाळी कामाला जाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना (Mumbai News) मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावरची (Mumbai Harbour Local) लोकल सेवा ठप्प झाली होती.

जुईनगरजवळ (Juinagar) सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाशी (Vashi) ते पनवेल (Panvel) मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली होती. मात्र आता बिघाड दुरुस्त झाला आहे. मात्र तरिही हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीतच आहे. त्यामुळे लोकलच्या प्रवाशांची सकाळ त्रासदायक ठरली आहे.

हार्बर मार्गावरील बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ दखल घेत बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र तरिही हार्बर मार्गावरील वाहतूक अद्याप उशिरानंच सुरू आहे.

विस्कळीत असलेली उपनगरीय रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्यास उशीर होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बिघाड दुरूस्त होऊनही उपनगरीय रेल्वेसेवा 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे.

तब्बल एक तास हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प होती. लोकल सेवा विस्कळीत झाल्यानं सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत असणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसणार आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या