कल्याणमध्ये रिक्षाचालकाला हेल्मेट न घातल्यानं ठोठावला दंड

वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) ऑनलाइन दंड आकारणी (Online) प्रणाली सुरू केली खरी, मात्र अनेकदा ही दंड आकारणी काहींना डोकेदुखी ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

कल्याण पूर्व मलंग रोड द्वारली गावात राहणारे गुरुनाथ चिकणकर या रिक्षा चालकाला ऑनलाइन चालान आले. त्यानं अॅपवर तपासून पाहिले असता चक्क हेल्मेट परिधान न केल्यानं वाहतूक पोलिसांनी ५०० रुपयांचा दंड आकाराल्याचं त्याला दिसून आलं.

मुंबईच्या कांदिवली भागात ३ डिसेंबर रोजी एक दुचाकी चालक विना हेल्मेट प्रवास करत होता, त्याचा फोटो वाहतूक पोलिसांनी काढला. त्याचे हे चालान रिक्षा चालकाला आले असल्याचे समोर आले आहे. या दुचाकी चालकाचा दंड ऑनलाइन प्रणालीच्या इ चलनद्वारे रिक्षा चालक गुरुनाथ यांना आकारण्यात आला आहे.

रिक्षा चालक गुरुनाथ यांनी याप्रकरणी कल्याण वाहतूक पोलिसांना विचारणा केली. तर वाहतूक पोलिसांनी त्यांना ठाण्याला जाण्यासाठी सांगितलं. मात्र माझी चूक नसतांना मी ठाणे इथं का जावं, वाहतूक पोलिसांनी केलेली चूक त्यांनी सुधारून द्यावी अशी मागणी गुरुनाथ यांनी केली आहे.

आता या प्रकरणात लवकरात लवकर आपल्याला आलेला दंड आणि नोटीस रद्द करण्याची मागणी रिक्षा चालक गुरुनाथ यांनी केली आहे.


हेही वाचा

'बेस्ट'च! आता मध्यरात्रीही बस धावणार

पश्चिम रेल्वेवर १५ डबा लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या