Advertisement

'बेस्ट'च! आता मध्यरात्रीही बस धावणार

मुंबई रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या चाकरमान्यांना वाहतुक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बेस्टनं पुढाकार घेतला आहे.

'बेस्ट'च! आता मध्यरात्रीही बस धावणार
SHARES

मुंबई लोकल ही शहराची लाईफलाईन मानली जाते, तर मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून बेस्ट बस ओळखली जाते. मागील अनेक वर्षापासून बेस्ट बस मुंबईकरांना कमीदरात वाहतुक सुविधा देत आहे. शिवाय विविध सवलती उपलब्ध करून देत आहे. अशातच आता मुंबई रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या चाकरमान्यांना वाहतुक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बेस्टनं पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, बेस्ट बस आता मध्यरात्रीही धावणार आहे. 

बेस्ट येत्या ७ मार्चपासून ही सुविधा प्रवाशांसाठी सुरू करणार आहे. गुरूवार ३ मार्च रोजी बेस्टनं याबाबत निर्णय घेतला. बेस्टच्या या निर्णयामुळं रात्रीच्यावेळी मुंबईत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला दिलासा मिळणार आहे. बेस्टच्या निर्णयानुसार, रात्रीच्यावेळी दर तासाला बस धावणार आहे. मध्यरात्री १ वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत बस चालवल्या जाणार आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी या निर्णयाला दुजोरा दिल्याचं समजतं. 

रात्रीचा बस मार्ग 

  • माहीम बस स्थानक ते कुलाबा बस डेपो मार्गावर मध्यरात्री ते पहाटे ४ वाजेपर्यंत बस धावेल. दर तासाला एक बस धावेल.
  • सायन ते कुलाबा, माहीम ते बोरिवली पश्चिम स्थानकापर्यंतही बसेस धावणार आहेत.
  • सायन ते मुलुंड पश्चिमेकडे एक आणि सायन ते बॅकबे डेपो ही सेवा पहाटे ५ वाजेपर्यंत चालवल्या जातील.
  • मुंबई छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावरूनही बससेवा असेल.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा