पश्चिम रेल्वेवर १५ डबा लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ

दिवसेंदिवस लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच लोकल फेऱ्या कमी त्यात प्रवासी गर्दी अधिक असल्यानं लोकल प्रवास हा त्रासदायक ठरत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना दिलासा दिला आहे. पश्चिम रेल्वेवरील १५ डब्यांच्या लोकलच्या  फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

पश्चिम रेल्वेवरील १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचे नियोजन सुरू असून १२ डबा लोकलला ३ डबे जोडून तिचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहेया माध्यमातून २७ फेऱ्या वाढविण्याचा विचार रेल्वे प्रशासन पातळीवर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंत जलद १५ डबा लोकल चालवल्या जात होत्या. मात्र पश्चिम रेल्वेच्या अंधेरी, बोरिवली, भाईंदर, मीरा रोड, विरारसारख्या स्थानकात दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत आहे. परिणामी, सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या गर्दीमुळे प्रवास जीवघेणा बनत आहे. ही बाब लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी अंधेरी ते विरार धीम्या मार्गावर १५ डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी फलाटांची लांबी वाढवण्यात आली आणि त्यानंतर हा प्रकल्प एप्रिल २०२१ मध्ये पूर्ण केला.

प्रकल्प पूर्ण होताच धीम्या मार्गावरही १५ डब्यांच्या लोकल चालवण्यात आल्या. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळाला आणि गर्दीतून सुटका मिळाली. सध्या १५ डबा लोकलच्या दररोज एकूण जलद व धीम्या मार्गावर ७९ फेऱ्या होत आहेत.

यात आणखी वाढ करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. फेऱ्यांमध्ये वाढ करतानाच १२ डबा लोकलचे पंधरा डबा लोकलमध्ये रुपांतर करण्यात येईल. त्यामुळे २७ फेऱ्यांची भर पडेल.

धीम्या  जलद मार्गावर या फेऱ्या होतीललवकरच या फेऱ्याही प्रवाशांच्या सेवेत येतीलत्याशिवाय १२ डबा लोकलच्याही आठ फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या