15 आणि 16 ऑगस्टला पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वेकडून (western railway) शनिवार आणि रविवारी बोरिवली-भाईंदर (bhayandar) स्थानकांदरम्यान रात्रकालीन जम्बो ब्लॉक (jumbo block) घेण्यात येणार आहे. 

तसेच रविवारी दिवसा ब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाडाच्या (technical fault) घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या होत्या. यामुळे पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला. तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

याच पार्श्वभूमीवर या तांत्रिक बिघाडाच्या घटनांना आवर घालण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार, 15 ऑगस्ट व रविवार, 16 ऑगस्ट रोजी बोरीवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्यरात्री 00:30 ते 04:30 पर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर 4 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे उपनगरीय वाहतुकीवर काहीसा परिणाम होईल.

ब्लॉकच्या कालावधीत, विरार/वसई रोड आणि बोरीवली/गोरेगाव दरम्यानच्या सर्व अप धीम्या मार्गावरील गाड्या अप जलद मार्गावर धावतील.

त्याचप्रमाणे, विरारच्या दिशेने जाणाऱ्या सर्व डाउन धीम्या मार्गावरील गाड्या गोरेगाव (goregaon) आणि वसई रोड/विरार दरम्यान डाउन जलद मार्गांवर धावतील.

तसेच ब्लॉकदरम्यान काही उपनगरीय सेवा रद्द केल्या जाणार असल्याचेही पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा

ठाण्यातील ‘रेमंड कट’ 30 दिवसांसाठी बंद

मोकाट कुत्र्यांना आवरण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून स्थानक अधिकाऱ्यांची नियुक्ती

पुढील बातमी
इतर बातम्या