कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आता दिवसातून दोन वेळा

कोल्हापूर शहराला मुंबईसोबत जोडणाऱ्या हवाई कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत या मार्गावर केवळ एकच विमानसेवा उपलब्ध होती. आता 11 नोव्हेंबरपासून कोल्हापूर-मुंबईदरम्यान दिवसातून दोन वेळा विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी इंडिगो एअरलाइन्सने पुढाकार घेतला आहे.

सध्याच्या विमान कंपनीच्या ‘ना-हरकत’ प्रमाणपत्रामुळे इंडिगोला या मार्गावर सेवा सुरू करण्यात अडचण येत होती. हा मार्ग ‘उडान’ योजनेत असल्याने ही मर्यादा होती. मात्र, आता सप्टेंबर महिन्यात या योजनेची मुदत संपत असल्यामुळे अन्य विमान कंपन्यांसाठी हा मार्ग खुला झाला आहे.

इंडिगोने कोल्हापूर-मुंबईसाठी मागणी केलेल्या मार्गाला मंजुरी मिळाली असून 11 नोव्हेंबरपासून सकाळी आणि रात्री अशा दोन विमानसेवा कोल्हापूर-मुंबई आणि मुंबई-कोल्हापूर या मार्गावर दोन नव्या सेवा सुरू होणार आहेत.

सकाळची सेवा

मुंबई-कोल्हापूर: पहाटे 6:05 वाजता मुंबईहून निघेल आणि सकाळी 7:00 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.

कोल्हापूर-मुंबई: सकाळी 7:35 वाजता कोल्हापूरहून निघेल आणि सकाळी 8:30 वाजता मुंबईला पोहोचेल.

ही सेवा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चालवली जाईल.

रात्रीची सेवा

मुंबई-कोल्हापूर: रात्री 7:10 वाजता मुंबईहून निघेल आणि रात्री 8:05 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.

कोल्हापूर-मुंबई: रात्री 8:35 वाजता कोल्हापूरहून निघेल आणि रात्री 9:35 वाजता मुंबईला पोहोचेल.

रात्रीची ही सेवा नवी मुंबई विमानतळावरून चालवली जाईल.


हेही वाचा

मुंबईत 9 विमानांचं गो अराउंड, गो अराउंड

14 ऑगस्टपासून अटल सेतू मार्गे विशेष महिला बस सेवा

पुढील बातमी
इतर बातम्या