मुंबईतील मुसळधार पावसामुळे मुंबईत येणारी विमानं देखील हवेतच अडकली. मुंबई विमानतळावर लँड करणारे तब्बल 9 विमानांना गो अराउंड, गो अराउंडचा सिग्नल देण्यात आला. त्यामुळे 9 विमानं आकाशात चकरा मारत बसली होती. तर अहमदाबादकडून मुंबईकडे येणारं इंडिगोचं 6E6468 विमान मुसळधार पावसामुळे मुंबई ऐवजी सूरतकडे वळवण्यात आले.
सोमवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हवाई आणि रस्ते प्रवास विस्कळीत झाला. ज्यामुळे नऊ विमानांना लँडिंग रद्द करावे लागले आणि 'गो-अराउंड' करावे लागले, तर एक विमान खराब दृश्यमानता आणि हवामान परिस्थितीमुळे वळवण्यात आले.
इंडिगोने ट्विटरवर म्हटले आहे की, "मुंबईत पावसाची उपस्थिती अजूनही जाणवत आहे आणि काही भागात रस्ते प्रवास प्रभावित झाला आहे. सततच्या पावसामुळे आणि पाण्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या काही मार्गांवर वाहतूक मंद गतीने सुरू आहे. जर तुम्ही आज विमान पकडणार असाल, तर आम्ही शिफारस करतो की तुम्ही लवकर निघून आमच्या अॅप आणि वेबसाइटद्वारे तुमच्या विमानाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवा. आमचे विमानतळ पथक वाटेत तुम्हाला मदत करण्यास तयार आहेत.
भारतीय हवामान विभागाने (IMD) 19 ऑगस्टपर्यंत मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये काही ठिकाणी "मुसळधार ते अति मुसळधार पाऊस" पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत सांताक्रूझमध्ये 85 मिमी आणि कुलाबामध्ये 55 मिमी पावसाची नोंद झाली. उपनगरीय भागात जास्त पाऊस पडला: दहिसरमध्ये 188 मिमी, कांदिवलीमध्ये 150 मिमी आणि कॉटन ग्रीनमध्ये 145 मिमी पाऊस पडला.
हेही वाचा