कोकण रेल्वेचे विशेष पावसाळी वेळापत्रक जाहीर

कोकण प्रदेशात मुसळधार पाऊस (rainy season), भूस्खलनाचा धोका आणि भूभागाच्या अडचणींबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर, कोकण रेल्वेने पावसाळ्याच्या तयारीचे व्यापक काम हाती घेतले आहे.

15 जून ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत लागू होणाऱ्या विशेष पावसाळी वेळापत्रकाला अंतिम स्वरूप देताना रेल्वे प्रशासनाने प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

यामध्ये मार्गालगतच्या संवेदनशील भागांचे बळकटीकरण, जमिनीचे अधिक मजबूत स्थिरीकरण सुनिश्चित करणे आणि रुळांची नियमित तपासणी यांचा समावेश आहे. तसेच भूस्खलन प्रवण प्रदेशांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

पावसाळ्यात विशेषत: गणेशोत्सवात (ganesh chaturthi) मोठ्या प्रमाणात मुंबईहून (mumbai) चाकरमानी कोकण रेल्वेचा वापर करतात. यावेळेत सर्व प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे विशेष तयारी करत आहे.

याव्यतिरिक्त, मुसळधार पावसामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे लवकर निदान सुनिश्चित करण्यासाठी तपासणीची वारंवारता वाढवण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या हालचालींच्या यंत्रणेवर थेट देखरेख वाढवली असून मार्गावर अतिरिक्त गस्त सुरू केली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत समन्वय सुधारण्यासाठी, तसेच भूस्खलन, पूर इत्यादींसारख्या घटनांमध्ये प्रतिसाद देण्याचा वेळ कमी करण्यासाठी तांत्रिक प्रणालींमध्येही वाढ करण्यात आली आहे.

कोकण रेल्वे प्रशासन हवामानाचे अहवाल आणि अंदाजांसंबंधी माहितीसाठी भारतीय हवामान विभागाशी (IMD) नियमित समन्वय साधत आहे आणि त्यानुसार रेल्वे सेवांमधील संभाव्य व्यत्यय व प्रवाशांची सुरक्षितता कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे.

पावसाळ्यात, सुरक्षिततेच्या कारणास्तव संवेदनशील भूभागावरील काही विशिष्ट ठिकाणी रेल्वे सेवा नियंत्रित वेगाने चालवल्या जातील.

प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी आगमन आणि प्रस्थानाच्या वेळा तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण हवामानामुळे त्यात बदल होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

दादर पश्चिम-दादर पूर्वेला जोडणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद

एअर इंडियानंतर इंडिगोच्याही देशांतर्गत विमानसेवेत घट

पुढील बातमी
इतर बातम्या