दोन दिवस कोपरी ब्रिज बंद, वाहतुकीसाठी 'हे' मार्ग खुले

(Representational Image)
(Representational Image)

MMRDAच्या कोपरी पुलावरील बांधकाम सुलभ करण्यासाठी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे शनिवार, २९ मे आणि रविवार ३० मे रोजी प्रवाश्यांसाठी बंद राहील. प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्ग आणि मार्ग बदलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हा पूल मुंबई ते ठाणे दरम्यानच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी ९ वाजता आणि रविवारी रात्री ११ ते सोमवार ते सकाळी ६ वाजेपर्यंत हलक्या आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

एका अधिकृत अधिसूचनेनुसार, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लोकांनी वाहतूक पोलिसांनी सांगितलेल्या मार्गानं जावं.

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेमार्गे ठाणे आणि नाशिक-मुंबई महामार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या मोटार वाहनांसाठी कोपरी पुलाकडे जाणारा नौपाडा सर्व्हिस रस्ता बंद राहील.

दरम्यान, नाशिक महामार्गामार्गे ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी खरेगाव टोल प्लाझा बंद राहील. त्यासाठी मुंब्रा-शिल्फाटा-रबाळे-ऐरोली मार्गे वाहतुक वळवली जाऊ शकते.

घोडबंदर रोडमार्गे जाणाऱ्यांसाठी माजिवडा पुलाखालचा रस्ता आणि डावीकडील रस्ताही बंद ठेवण्यात येणार आहे. त्याऐवजी ठाणे आणि नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रवासी ऐरोली पुलाचा मार्ग घेऊन पूर्व द्रुतगती महामार्गावर पोहोचू शकतात.

घोडबंदर रोडहून प्रवास करणार्‍यांनी तीन हाथ नाका इथून डावीकडून एलबीएस रोड किंवा आनंद नगर चेक पोस्ट मार्गे मुंबईला जाता येते. त्याऐवजी ते मुंबईत जाण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गाकडे जाण्यासाठी ऐरोली पूल घेऊ शकतात.


हेही वाचा

टोलनाक्यांवर १०० मीटरपेक्षा मोठी रांग असल्यास टोल माफ

महिन्याभरात रेल्वे प्रवाशांमध्ये तब्बल ७२५ प्रवासी कोरोनाबाधित

पुढील बातमी
इतर बातम्या