Advertisement

महिन्याभरात रेल्वे प्रवाशांमध्ये तब्बल ७२५ प्रवासी कोरोनाबाधित

परराज्यातून आणि महाराष्ट्रातील विविध भागातून रेल्वेने मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांची ही कोरोना चाचणी केली जात आहे.

महिन्याभरात रेल्वे प्रवाशांमध्ये तब्बल ७२५ प्रवासी कोरोनाबाधित
SHARES

मुंबईसह(mumbai) राज्यात कोरोनाच्या बधितांची संख्या घटत असली, तरी या कोरोनाला मुळापासून नष्ट करण्यासाठी महापालिका (bmc) व राज्य सरकारनं कोरोना चाचणी करण्याचं प्रमाण वाढवलं. शिवाय परराज्यातून आणि महाराष्ट्रातील(maharashtra) विविध भागातून रेल्वेने मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांची ही कोरोना चाचणी केली जात आहे. त्यानुसार, १७ एप्रिल ते २६ मेपर्यंत तब्बल ७२५ प्रवासी कोरोनाबाधित आढळले. त्यांना तात्काळ कोरोना केंद्र, रुग्णालय, गृहविलगीकरणात पाठवण्यात आले. 

गेल्या २ दिवसांतही २२ प्रवाशांना कोरोनाची (coronavirus) लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने केरळ, गोवा, गुजरात, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड या संवेदनशील भागातून महाराष्ट्रात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय १७ एप्रिल रोजी घेतला. त्यानंतर १ मे रोजी उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालही या संवेदनशील भागाच्या यादीत आले. 

या संवेदनशील भागातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या वेळेपासून ४८ तासांमध्ये कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे, तरीही प्रवासी ही चाचणी टाळून प्रवास करण्याची शक्यता असल्याने सर्वच प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाते. त्यातच संशयित प्रवाशांची आरटीपीसीआर किंवा अँटिजन करण्यात येते.

पश्चिम रेल्वेच्या (western railway) मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई रोड, तर मध्य रेल्वेच्या (central railway) सीएसएमटी, दादर टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल स्थानकांत या चाचण्या होतात. १७ एप्रिल ते २६ मेपर्यंत २ लाख ७६ हजार ३५९ प्रवाशांची कोरोना चाचणी केली असून, यात ७२५ प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत.

सर्वाधिक कोरोनाबाधित हे २ मे रोजी आढळले. या दिवशी ५ हजार २३८ प्रवाशांची चाचणी करताना त्यात ४३ प्रवाशांना कोरोनाची लक्षणे असल्याचे निदर्शनास आले. तर ६ मे रोजी ८ हजार ७६९ प्रवाशांच्या चाचणीवेळी ४६ प्रवासी आणि २५ तसेच २६ मे रोजी झालेल्या चाचणीत २२ प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. एप्रिल महिन्यात केलेल्या चाचणीत मुंबईत आलेले २९१ आणि मे महिन्यात ४३४ प्रवासी कोरोनाबाधित होते.

एप्रिल व मे महिन्यात मुंबई दाखल झालेल्या २ लाख ७६ हजार ३५९ प्रवाशांपैकी मे महिन्यात २ लाख १७ हजार ११९ प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक म्हणजे १४ हजार ७९६ प्रवाशांच्या चाचण्या २१ मे रोजी करण्यात आल्या तर, त्यापूर्वी १९ मे रोजी १४२४८ आणि २२ मे रोजी ११ हजार ८६६, तर २५ मे रोजी १३ हजार ३४९ प्रवाशांची कोरोना चाचणी झाली.



हेही वाचा - 

दारू अवैध विकली जाते म्हणून बंदी उठवणं तर्कहीन- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरमध्ये दारूबंदी उठवली, सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा