मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प!

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • परिवहन

बुधवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढलं आहे. गुरूवारी पहाटे महाडजवळ मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळेे महामार्गावर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

कुठे घटली घटना?

गुरूवारी पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस पडत असताना महाडमधील केंबुर्ली गावातून जाणाऱ्या मुंबई- गोवा महामार्गावर ही दरड कोसळली. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

वाहनांच्या लांब रांगा

स्थानिक प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. सध्या जेसीबीच्या साहाय्याने महामार्गावरील दरड हटवण्याचं काम केलं जात आहे. परंतु या घटनेमुळे महामार्गाच्या मुंबई आणि गोवा अशा दोन्ही दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

सुदैवाने या घटनेत अद्याप तरी कुणालाही दुखापत झाल्याची माहिती हाती आलेली नाही. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली जाईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक प्रशासनाने दिली.


हेही वाचा-

अंधेरी ते चर्चगेट वाहतूक दिवसभर राहणार बंद


पुढील बातमी
इतर बातम्या