Advertisement

अंधेरी ते चर्चगेट वाहतूक दिवसभर राहणार बंद


अंधेरी ते चर्चगेट वाहतूक दिवसभर राहणार बंद
SHARES

अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक बुधवारी सकाळी सुरू झाली खरी, परंतु तांत्रिक कारणांचा हवाला देत अवघ्या काही तासांमध्येही अंधेरी वरून चर्चगेटच्या दिशेने सुटणारी वाहतूक बंद करण्याची पाळी पश्चिम रेल्वेवर ओढावली आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमधून चांगलाच रोष व्यक्त करण्यात येत आहे.


 

प्रवासी पुन्हा अडकले

ट्रॅकवरील ढिगारा बाजूला काढल्यानंतर बुधवारी सकाळी पश्चिम रेल्वेने अंधेरीपासून धिम्या आणि जलद मार्गांवरील वाहतूक सुरू  झाली. ही वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीराने सुरू  असून सकाळच्या सुमारास लोकलवरील ताण वाढल्याने काही लोकल रद्दही करण्यात आल्या. मात्र हळूहळू का होईना लोकल सुरू असल्याने प्रवासी कसेबसे करत आपापल्या कामाधंद्याच्या ठिकाणी पोहोचत आहेत.

मात्र १०.३० वाजेच्या सुमारास तांत्रिक कारणांचा हवाला देत पश्चिम रेल्वेने अंधेरीतील हार्बरचा प्लॅटफाॅर्म क्रमांक १ आणि ४ वरील वाहतूक दिवसभर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी अंधेरीवरून चर्चगेटच्या दिशेने सुटणारी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. अंधेरीवरून सुटणाऱ्या लोकल सेवेचा प्रवाशांना मोठा फायदा होतो. त्यामुळे पुन्हा एकदा या मार्गावरील प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशी मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे.



हेही वाचा-

अंधेरीचा गोखले पूल बंद, 'या' मार्गावरून करा प्रवास

अंधेरी पूल दुर्घटना : मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना ५ लाखांचं बक्षीस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा