Advertisement

अंधेरी पूल दुर्घटना : मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना ५ लाखांचं बक्षीस


अंधेरी पूल दुर्घटना : मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना ५ लाखांचं बक्षीस
SHARES

मंगळवारी सकाळी अंधेरी रेल्वे रूळावर पुल कोसळताना पाहिल्याबरोबर काही अंतरावरच मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी इमर्जन्सी ब्रेक लावत लोकल थांबवली. सावंत यांनी समयसूचकता दाखवत हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले. सावंत यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही सावंत यांचं कौतुक केलं असून त्यांना ५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. तर दुर्घटनेतील सर्व जखमींचा खर्च रेल्वे करणार असून जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदतही रेल्वेमंत्र्यांनी जाहिर केली आहे.


हजारो प्रवाशांचे प्राण वाचवले

मंगळवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास अंधेरी स्थानकातून चर्चगेटला जाणारी लोकल निघताच या लोकलचे मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना रेल्वे रूळावर पुल कोसळत असताना दिसले. दुर्घटनेच्या ठिकाणापासून लोकल अवघ्या १०० मीटर अंतरावर होती. लोकलने तेव्हा वेग पकडला होता. मात्र, सावंत यांनी समयसूचकता दाखवत इमर्जन्सी ब्रेक लावले. यावेळी लोकल पुढे काही अंतरावर थांबली. इमर्जन्सी ब्रेक लावले नसते तर मोठी अाणखी मोठी दुर्घटना घडली असती. य़ामुळे हजारो प्रवाशांचे प्राण धोक्यात अाले असते.


दोघे आयसीयूमध्ये

या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून त्यांना विर्लेपार्ले येथील कुपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सातपैकी पाच जण किरकोळ जखमी असून दोन जण गंभीर जखमी आहेत. दोघांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर या सर्व जखमींचा खर्च रेल्वे करणार अाहे. जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली. 



हेही वाचा -  

उपनगरातील ४४५ पुलांचं आयआयटी करणार आॅडीट - रेल्वेमंत्री 

अंधेरी पूल दुर्घटना : बेस्ट, मेट्रो ठरली प्रवाशांची तारणहार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा