Advertisement

अंधेरी पूल दुर्घटना : बेस्ट, मेट्रो ठरली प्रवाशांची तारणहार


अंधेरी पूल दुर्घटना : बेस्ट, मेट्रो ठरली प्रवाशांची तारणहार
SHARES

सकाळची सात वाजताची वेळ म्हणजे चाकरमान्यांची घाई. अशा घाईच्या वेळेत वाहतुकीचा मुख्य पर्याय असलेली लोकल सेवाच ठप्प झाली तर चाकरमान्यांचे हालच हाल होतात. असंच काहीसं झालं ते मंगळवारी सकाळी. अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळावर गोखले पादचारी पुलाचा भाग कोसळल्यानंतर पश्चिम आणि हार्बर रेल्वे सेवा पूर्णपणे बंद झाली. त्यात पावसाचा गोंधळ सुरूच होतात. अशा वेळी चाकरमान्यांसाठी आधार ठरली ती बेस्ट आणि मेट्रो.


प्रवाशांना दिलासा

अंधेरी पुल दुर्घटनेनंतर रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्यानं बेस्ट प्रशासनानं पुढं येत त्वरीत अंधेरी परिसरात अतिरिक्त गाड्या सोडण्यास सुरूवात करत प्रवाशांना दिलासा दिला. अंधेरी पुल दुर्घटनेमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालीच होती. पण त्याचवेळी मंगळवारी पहाटेपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं अनेक ठिकाणी पाणीही साचलं होतं. त्यामुळंही वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी बेस्ट मुंबईसह उपनगरात अतिरिक्त गाड्या सोडण्यास सुरूवात केली.


८४ अतिरिक्त बस 

दुपारी तीन वाजेपर्यंत बेस्टनं तब्बल ८४ अतिरिक्त गाड्या सोडल्या. गोरेगाव ते परळ ७, अंधेरी ते बोरीवली १२, माहिमसाठी ६, हुतात्मा चौकसाठी २, वांद्र्यासाठी ९, वांद्रे ते बोरीवलीसाठी ७, दादर ते बोरीवलीदरम्यान २, जोगेश्वरी ते बोरीवलीसाठी २, कलानगर ते बोरीवलीसाठी ९ अशा एकूण ८४ अतिरिक्त गाड्या सोडत बेस्टनं प्रवाशांची मदत केली.


मेट्रो स्थानकांवर गर्दी

बेस्टनंतर मंगळवारी चाकरमान्यांसाठी, प्रवाशांसाठी दुसरा मोठा आधार ठरली ती मेट्रो-१. वर्सोवा, साकीनाका, मरोळ, घाटकोपर असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी मेट्रोचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे सकाळी आठनंतर सर्वच मेट्रो स्थानकावर नेहमीपेक्षा प्रवाशांची मोठी गर्दी व्हायला सुरूवात झाली. दुपारपर्यंत ही गर्दी कायम होती.



हेही वाचा -

तब्बल सात तासांनंतर हार्बर सेवा सुरू

पश्चिम रेल्वे पूर्ववत होण्यास मध्यरात्र उजाडणार!



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा