Advertisement

तब्बल सात तासांनंतर हार्बर सेवा सुरू


तब्बल सात तासांनंतर हार्बर सेवा सुरू
SHARES

मंगळवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रूळावर गोखले पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेसहीत हार्बर सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर तब्बल सात तासांनंतर, दुपारी २ वाजून १६ मिनिटांनी हार्बर मार्गावरून अंधेरीवरून पहिली लोकल सीएसएमटीच्या दिशेने धावली आणि हार्बर प्रवाशांना दिलासा मिळाला. त्यानंतर अंधेरी ते पनवेल लोकलही सुरू झाली.


 

हार्बरच्या प्रवाशांना दिलासा

सकाळपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी ते विरार आणि हार्बर मार्गावरील गोरेगाव ते सीएसएमटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. एकीकडं ट्रॅकवर मातीचा ढिगारा आणि दुसरीकडं ओव्हरहेड वायर तुटलेली, या दोन्हीमुळं रेल्वे सेवा कधी पूर्ववत होणार नि चाकरमान्यांना कधी दिलासा मिळणार हाच प्रश्न होता. अखेर एनडीआरएफ, अग्निशमन दल, रेल्वे पोलिस, रेल्वे, पोलिस, पालिका या सर्व यंत्रणांनी त्वरीत मदतकार्य सुरू करत ढिगारा काढण्याचं काम सुरू केलं असून यासाठी आणखी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. पण तुटलेल्या ओव्हरहेड वायरची दुरूस्ती करत रेल्वे प्रशासनानं हार्बर सेवा ट्रॅकवर आणली.


 


अंधेरी ते विरार लोकल ठप्पच

तब्बल सात तासांनंतर हार्बर सेवा पूर्ववत झाली असली पश्चिम मार्गावरील अंधेरी ते विरार लोकल सेवा कधी सुरू होणार हा मात्र अजूनही प्रश्नच आहे. रूळावरील मातीचा ढिगारा काढण्याचं काम सुरू असून पावसामुळं या कामात अडथळा येत असल्यानं यासाठी वेळ लागत आहे. रात्री उशीरापर्यंत ही सेवा सुरू होईल असं रेल्वेतील सुत्र सांगत आहेत. पण पश्चिम रेल्वेकडून मात्र यासंबंधीची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अंधेरी ते विरार सेवा कधी होणार हा प्रश्न अधांतरीतच आहे. तर अंधेरी ते चर्चगेट सेवा कधी सुरू होणार हेही अनुत्तरीतच अाहे. 



हेही वाचा -

पश्चिम रेल्वे पूर्ववत होण्यास मध्यरात्र उजाडणार!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा