Advertisement

अंधेरीचा गोखले पूल बंद, 'या' मार्गावरून करा प्रवास

या पुलाच्या दुरूस्तीसाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक पर्याय मार्गांनी वळवली आहे.

अंधेरीचा गोखले पूल बंद, 'या' मार्गावरून करा प्रवास
SHARES

अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेमुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला असून वाहनचालकांनी या पुलाऐवजी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचं आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केलं आहे.


कधी घडली घटना?

अंधेरी पश्चिम आणि पूर्वेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा पादचारी भाग सकाळी ७ वाजेच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवर कोसळल्याने मंगळवारी पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या दुर्घटनेत ६ जण जखमी झाले असून २ जणांची प्रकृती अत्यावस्थ आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी ट्रॅकवरील ढिगारा उपसल्यावर पश्चिम रेल्वेची वाहतूक १६ तासांनंतर पूर्वपदावर आली असली, तरी पुलावरील वाहतूक मात्र सुरू होऊ शकली नाही.


 


कुठले आहेत, पर्यायी मार्ग?

या पुलाच्या दुरूस्तीसाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक पर्याय मार्गांनी वळवली आहे. त्यानुसार या पुलाचा वापर करणाऱ्या वाहन चालकांना जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ब्रिज, सांताक्रूझमधील मिलन उड्डाणपूल, गोरेगावमधील मृणालताई गोरे, पार्ल्यातील कॅप्टन गोरे ब्रिज आणि अंधेरी-खार मिलन सब वे चा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.



हेही वाचा-

उपनगरातील ४४५ पुलांचं आयआयटी करणार आॅडिट - रेल्वेमंत्री

अंधेरी पूल दुर्घटना : मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना ५ लाखांचं बक्षीस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा