नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या वेळात बदल, 'हे' आहे नवे वेळापत्रक

गेले तीन वर्षांपासून माथेरान नेरळ मिनी ट्रेन (Matheran Neral Mini Train) सेवा बंद होती. पण आता गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा नेरळ माथेरान मिनी ट्रेन सुरळी धावायला सुरुवात झाली आहे. 

पुन्हा नव्याने सुरू झालेल्या नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या वेळात मोठे बदल करण्यात आले आहेत. तर मध्य रेल्वेकडून आज सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. नव्याने जारी केलेलं हे वेळापत्रक फक्त विकेंडसाठी म्हणजे शनिवार रविवारसाठी आहे.

गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन 22 ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत पुन्हा दाखल झाली. दिवसभरात अप व डाऊन अशा चार फेऱ्या होतात. नेरळ ते माथेरानबरोबरच अमन लॉज ते माथेरान अशा शटल सेवाही चालवण्यात येतात. सध्या प्रत्येकी सहा डब्यांच्या तीन मिनी ट्रेन असून त्या डिझेल इंजिनावर धावतात.


हेही वाचा

रेल्वे गाड्या आता 24 डब्यांच्या, प्रवास हो़णार सुखकर

पुढील बातमी
इतर बातम्या