Advertisement

रेल्वे गाड्या आता 24 डब्यांच्या, प्रवास हो़णार सुखकर

एकाचवेळेस अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

रेल्वे गाड्या आता 24 डब्यांच्या, प्रवास हो़णार सुखकर
SHARES

आता रेल्वे गाड्या या तब्बल 24 डब्ब्यांच्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे एकाचवेळेस अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसेच यातून रेल्वेलाही उत्पन्न मिळणार आहे. 

मुंबईतून दररोज सीएसएमटीवरुन बाहेरगावी अनेक रेल्वे गाड्या जातात. या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या डब्ब्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे.  या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना तब्बल  24 डब्बे असणार आहेत. आता डब्बे वाढले म्हटल्यावर प्लॅटफॉर्मही वाढवावा लागणार. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 10, 11, 12 आणि 13 ची लांबी वाढवली जाणार आहे.  

परवडणारे तिकीट दर,  सुरक्षित प्रवास आणि वेळेत पोहचण्याची हमी यामुळे रेल्वेला प्रवाशांची पहिली पसंती असते. मात्र आता या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.



 हेही वाचा

IRCTC ने जारी केल्या प्रवासाच्या नवीन गाईडलाईन्स, 'या' नियमात बदल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा