मध्य रेल्वेवर ७२ तासांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्या होणार रद्द

मध्य रेल्वेलवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कामानिमित्त मध्य रेल्वेनं प्रवास करणार असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. मध्य रेल्वे मार्गावर तब्बल ७२ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गिकेच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गिकेचे काम अखेरच्या टप्यात आहे. आता या मार्गिकांमधील कामांसाठी ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान तब्बल ७२ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे मेल, एक्स्प्रेससह अनेक लोकल सेवा रद्द केल्या जाणार आहेत.

ठाणे ते दिवादरम्यान ९ किलोमीटर अंतराच्या दोन मार्गिकांचे काम अंतिम टप्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या १४ तासांच्या ब्लॉकमध्ये एक नवीन डाऊन जलद मार्गिका सुरू करण्यात आली.

या मार्गिकेवरून रेल्वे सेवा धावण्यास सुरुवात झाली आहे. तसंच, प्रस्तावित ब्लॉकमध्ये सहाव्या मार्गिकेचे काम केले जाणार आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या