'सीएसएमटी'ला 'सर्वोत्कृष्ट स्वच्छ प्रेक्षणीय स्थळ' पुरस्कार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे 'सीएसएमटी'ला ६ सप्टेंबर रोजी 'सर्वोत्कृष्ट स्वच्छ प्रेक्षणीय स्थळ' पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे.

१०० स्थळांची निवड

स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत देशभरातील १०० प्रेक्षणीय स्थळांची निवड करण्यात होती. यात तीन टप्प्यांमध्ये एकूण ३० स्थानके निवडण्यात आली होती. त्यातील पहिल्या टप्प्यांत 'सीएसएमटी' स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे.

 

संयुक्तपणे पुरस्कार

नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित या पुरस्कार प्रदान सोहळ्यात 'सीएसएमटी'सह मुंबई महापालिका, सीएसआर भागीदार यांना संयुक्तपणे या पुरस्काराने गौरविण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

‘या’ स्थळांचा गौरव

'सीएसएमटी'सह अजमेर शरीफ दरगाह, ताजमहल, सेंट फ्रान्सिस ऑफ अस्सी चर्च (गोवा), पैंगोग झील यांसह वैष्णोदेवी, तिरुपती, शबरीमला, नागवासुकी, महाकालेश्वर, कामाख्या या मंदिरांसह एकूण ३० स्थळांना स्वच्छ प्रेक्षणीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.


हेही वाचा-

CSMT स्थानक जगात सर्वात आश्चर्यकारक!

गणेशोत्सव २०१९ : यावर्षी मुंबईतल्या या '७' गणपती मंदिरांना भेट द्या


पुढील बातमी
इतर बातम्या