शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांसाठी लाइफस्टाइल मासिकाची सुरुवात

मुंबई सेंट्रल विभागाने मुंबई सेंट्रल–अहमदाबाद–मुंबई सेंट्रल शताब्दी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12009/12010) मधील प्रवाशांसाठी 'Track & Trend' या ऑनबोर्ड लाइफस्टाइल मासिकाची सुरुवात केली आहे.

पश्चिम रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ कमर्शियल मॅनेजर तरुण जैन यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई सेंट्रल विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आदिश पथानिया तसेच रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मासिक शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रवासादरम्यान वाचण्यासाठी यात लाइफस्टाइल, पर्यटन, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि प्रवास यांसारख्या विषयांवरील माहितीपूर्ण आणि रंजक लेखांचा समावेश असेल.

या मासिकाच्या वितरणासाठी सुरतस्थित M/s Insta Outdoor या कंपनीला तीन वर्षांचा करार देण्यात आला आहे. या करारातून पश्चिम रेल्वेला सुमारे ₹22 लाखांचे बिगर-भाडे (Non-Fare) उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

जुलै 2026 हा 'Track & Trend' मासिकाचा पहिला अंक असून, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देतानाच बिगर-भाडे उत्पन्न वाढवण्याच्या पश्चिम रेल्वेच्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.


हेही वाचा

पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत

पुढील बातमी
इतर बातम्या