मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर सोलापूरमार्गे धावणार

बंगळुरू ते मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही ट्रेन लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.

मुंबई (mumbai) आणि बंगळुरू (bangalore) रेल्वे मार्गावर नेहमी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना प्रवासाचा एक नवा पर्याय उपलब्ध होणार असून मोठा फायदा होणार आहे.

शिवाय ही वंदे भारत पुणे आणि सोलापूर (solapur) मार्गे धावणार आहे. त्यामुळे पुण्याहून बंगळुरू प्रवास अवघ्या 14 तासांत पूर्ण होणार आहे.

यापूर्वीच मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस (vande bharat sleeper) सोलापूरमार्गे धावणार हा निर्णय घेण्यात आला होता. आता त्या मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

यानंतर पुण्याचाही या मार्गात समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानंतर येत्या काही आठवड्यांतच ही ट्रेन सुरू होण्याची शक्यता असल्यची माहिती रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने Hindustan Timesशी बोलताना दिली आहे.

या रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या, वाढती मागणी, व्यवहार्यता आणि कार्यक्षमतेचे मूल्यांकन केले गेले. त्यानंतर हा मार्ग निश्चित करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी मिरज आणि हुबळीमार्गे ही ट्रेन सोडण्याच्या चर्चा सुरू होत्या. पण यामुळे पुणे ते सोलापूर वंदे भारतचं भविष्य धोक्यात येईल अशी भीती होती.

पण अधिकाऱ्यांच्या मते, मिराजमार्गे सोडल्यामुळे अपेक्षेप्रमाणे प्रवासी संख्या मिळवणं कठीण झालं असतं. तसेच, अनेक तांत्रिक अडचणीही निर्माण होण्याची शक्यता होती.

त्याउलट, पुणे-सोलापूर मार्गावर प्रिमियम ट्रेनला मोठा प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्राहून कर्नाटकाला जाण्यासाठी अनेक नागरिक लांब पल्ल्यांच्या ट्रेनवर अवलंबून राहतात.

पण या नव्या मार्गामुळे मुंबई, पुणे, सोलापूर, कलबुर्गी आणि बंगळुरूदरम्यान प्रवास वेगवान आणि सोपा होणार आहे. रेल्वे बोर्डाने या ट्रेनसाठी तिकिट बुकिंगचे नियमसुद्धा जाहीर केले आहेत.


हेही वाचा

कॉलेजेसमध्ये सर्व प्रकारच्या फीची माहिती प्रदर्शित करणे आता बंधनकारक

नवी मुंबईतील 504 धोकादायक इमारतींची यादी जाहीर

पुढील बातमी
इतर बातम्या