जेटच्या २ हजार कर्मचाऱ्यांना स्पाईस जेटकडून नोकरी

आर्थिक तोट्यामुळं बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. जेटची प्रतिस्पर्धी असलेल्या स्पाईस जेट कंपनीनं जेटच्या २ हजार कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत सामावून घेण्याची योजना आखली आहे. त्यामुळं जेटमधील कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणं, स्पाइसजेटमध्ये सामावून घेण्यात येणाऱ्या जेटच्या कर्मचाऱ्यांमध्ये वैमानिक, केबिन क्रू आदींचा समावेश आहे.

बेरोजगारीची वेळ

जेट एअरवेज बंद पडल्यामुळं तब्बल २२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. जेट एअरवेजनं आतापर्यंत ११०० कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत सामील केले असून साधारण २ हजार कर्मचाऱ्यांसाठी स्पाईस जेट रोजगार उपलब्ध करून देणार आहे. यात पायलटपासून सुरक्षारक्षकांपर्यंच्या पदांचा समावेश आहे. स्पाईस जेटकडं बोइंग ७३७, बॉम्बार्डियर क्यू ४०० आणि बी ७३७ या विमानांचा समावेश आहे. स्पाईस जेट ६२ ठिकाणांहून ५७५ उड्डाणं करतात. यामध्ये ९ आंतरराष्ट्रीय ठिकाणांचा समावेश आहे.

१०० प्रवासी विमानं

जेटच्या २२ विमानांचा स्पाईस जेटनं आपल्या ताफ्यात समावेश केला आहे. सध्या स्पाईस जेटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १४ हजार असून कंपनीकडं १०० मोठी प्रवासी विमानं आहेत. एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगोनंतर स्पाईस जेट ही चौथी कंपनी आहे. या कंपनीकडं १०० विमानं आहेत.


हेही वाचा -

लोकलमध्ये आढळलं ७ दिवसांचे अर्भक, वेळीच फोन आल्यानं वाचले बाळाचे प्राण

'गांधीजींबद्दल ट्विट केल्याबद्दल निधी चौधरींवर कारवाई करा’, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


पुढील बातमी
इतर बातम्या