Advertisement

गांधीजींबद्दल ट्विट केल्याबद्दल निधी चौधरींवर कारवाई करा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पालिका उपायुक्त निधी चौधरींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडं केली आहे.

गांधीजींबद्दल ट्विट केल्याबद्दल निधी चौधरींवर कारवाई करा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
SHARES

महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यामुळं महिला आयएएस अधिकारी निधी चौधरी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पालिका उपायुक्त निधी चौधरींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडं केली आहे. शरद पवारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. 'महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त गांधींना नोटेवरुन काढायला हवं. त्यांचे जगभरातील पुतळे हटवायला पाहिजे, असं ट्वीट मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी केलं होतं.


श्रद्धांजली देण्याची गरज

 'गांधींची १५० वी जयंती साजरी केली जात आहे. हीच योग्य वेळ आहे गांधींचा फोटो नोटेवरुन काढून टाकण्यासाठी आणि जगभरातील त्यांचे पुतळे हटवण्यासाठी. आता आपल्याला एक खरी श्रद्धांजली देण्याची गरज आहे. धन्यवाद गोडसे ३०. ०१.१९४८ साठी.', असं ट्वीट निधी चौधरी यांनी १७ मे रोजी केलं होतं.


अपमानास्पद वक्तव्य

निधी चौधरींच्या या ट्विटचा राष्ट्रवादी काँग्रेसनं समाचार घेतला आहे. 'गांधींविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानं आम्ही निधी चौधरी यांच्या निलंबनाची मागणी करतो. त्यांनी गांधींचा हत्यारा नथूराम गोडसेचे आभार मानले आहे. हे कधीही सहन केलं जाणार नाही.’ असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.


सक्त कारवाई करावी

शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकाऱ्यानं अशी जाहीरपणं भूमिका घेणं हे लांछनास्पद आहे. त्यामुळं अशा अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी सक्त कारवाई करावी, असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीलं आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महापुरुषांचा सरकारी अधिकाऱ्यांकडून गंभीर अपमान केला जात आहे. आणि त्याकडे राज्य शासन कानाडोळा करत असल्याची टीकाही शरद पवारांनी केली आहे.



हेही वाचा -

टॅक्सीचं किमान भाडं ३० रुपये करण्याची टॅक्सीमेन्स युनियनची मागणी

रेल्वेप्रमाणं आता एसटीचा प्रवास होणार कॅशलेश



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा