Mumbai local news: Yatri App 'या' महिन्याच्या अखेरीस पश्चिम रेल्वेसाठी लाँच होणार

मध्य रेल्वेनंतर यात्री ॲप पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठीही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रवासी आता लवकरच अधिकृतपणे ट्रेनचं लोकेशन ट्रॅक करू शकणार आहेत.

यात्री ॲप अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्हीसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. आता हे ॲप पश्चिम रेल्वेसाठीही सुरू करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेच्या ९३ उपनगरीय रॅकवर जीपीएस डिव्हाइसेस इन्स्टॉल केली जात आहेत. हे डिव्हाइसेस एसी लोकलसाठीही इन्स्टॉल करण्यात येत आहेत. ॲपच्या अल्गोरिदमनुसार हे ॲप पश्चिम रेल्वे मार्गावर ट्रेनचं रियल टाईम लोकेशन सांगण्यास सक्षम असेल.

फीचर्स काय?

  • यात्री ॲपमध्ये युजर्सला अपडेटेड टाइमटेबल
  • तिकीटाचे दर
  • लांब पल्ल्याच्या गाड्यांची माहिती
  • आपत्कालीन नंबर्स
  • जर्नी प्लॅनर अशा अनेक सुविधा मिळतील.

ट्रेनचं लोकेशन कसं तपासाल?

  • तुम्ही ज्याठिकाणी आहात ते स्टेशन सिलेक्ट करा.
  • प्रवासाची दिशा निवडा. उदा. सीएसएमटी किंवा कल्याणच्या दिशेने
  • ट्रेनचं लाईव्ह लोकेशन मिळवण्यासाठी ट्रेनच्या टाइमटेबलवर क्लिक करा.

अलर्ट कसा सेट कराल?

  • प्रवासी त्यांच्या स्टेशनवरुन ट्रेन निवडू शकतात.
  • ५ ते ३० मिनिटं किंवा तुम्ही निवडलेल्या दिवसाआधी किंवा आठवड्यातील कोणत्याही दिवसांसाठी अलर्ट सेट करता येतो.
  • १५ सेकंदानंतर ॲप ऑटो रिफ्रेश होईल. तसंच युजर्स लेटेस्ट डेटासाठी रेफ्रेशवर क्लिक करू शकतात.

सर्वात आधी Yatri App मध्य रेल्वेसाठी सुरू करण्यात आलं होतं. काही महिन्यात मध्य रेल्वेवरील जवळपास ६ लाख युजर्सनी या ॲपचा वापर केला आहे. यात्री ॲपसाठी अशाच प्रकारचा प्रतिसाद पश्चिम रेल्वेवर मिळेल अशी अपेक्षा आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत Yatri App पश्चिम रेल्वेसाठी लाँच केलं जाईल अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक, निरज वर्मा यांनी दिली.


हेही वाचा

बेस्टच! ठाणे, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान प्रीमियम बस सेवा सुरू, वाचा सविस्तर

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ ची चाचणी यशस्वी, सेवा लवकर सुरू होण्याची शक्यता

पुढील बातमी
इतर बातम्या