Advertisement

बेस्टच! ठाणे, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान प्रीमियम बस सेवा सुरू, वाचा सविस्तर

नवीन प्रीमियम बस सेवेत (BEST Premium Bus) प्रवाशांसाठी खास स्वागत सवलत योजना देण्यात आली आहे.

बेस्टच! ठाणे, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान प्रीमियम बस सेवा सुरू, वाचा सविस्तर
SHARES

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि बेस्ट परिवहन उपक्रमांतर्गत 12 डिसेंबरपासून (आजपासून) ठाणे (Thane) ते वांद्रे कुर्ला (BKC) संकुलादरम्यान (BKC) नवीन प्रीमियम बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातून मुंबईला (Mumbai News) प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गारेगार आणि आरामदायी होणार आहे.

आजपासून सुरू झालेली ही सेवा पूर्णपणे वातानुकूलित आणि आरामदायी असणार आहे. सोमवार ते शनिवार अशी ही सेवा असणार आहे. बीकेसी ते ठाण्यादरम्यान प्रत्येकी 30 मिनिटांच्या अंतरानं ही सेवा धावणार आहे. चलो अॅपद्वारे (Chalo App) या बसमध्ये आसन आरक्षित केल्या जाऊ शकतील.

दिवसभर धावणाऱ्या बससाठी वांद्रे रेल्वे स्थानक (Bandra Railway Station) ते कुर्ला संकुलापर्यंत 50 रुपये भाडे आहे. तर वांद्रे कुर्ला संकूल (Bandra Kurla Complex) ते ठाण्यापर्यंत 205 रुपये भाडे आकारले जाणार आहे. या नवीन प्रीमियम बस सेवेत (BEST Premium Bus) प्रवाशांसाठी खास स्वागत सवलत योजना देण्यात आली आहे. एकेरी भाड्यात 5 बस फेऱ्यांचा लाभ मिळणार आहे.

एक्सप्रेस मार्गावर ठाणे ते बीकेसी दरम्यान सकाळी 7 ते सकाळी साडे आठपर्यंत 30 मिनिटांच्या अंतरानं या बसेस धावतील. त्यानंतर संध्याकाळी बीकेसी ते ठाणे दरम्यान संध्याकाळी 5.30 ते 7 पर्यंत बससेवा सुरू राहील. ऑल डे रुटसाठी बीकेसी ते वांद्रे स्टेशनदरम्यान सकाळी 8.50 ते संध्याकाळी 5.50 पर्यंत बससेवा असेल. तसेच वांद्रे स्टेशन ते बीकेसी दरम्यान सकाळी 9.25 ते संध्याकाळी 6.25 पर्यंत या प्रीमियम बस चालवल्या जातील.

नव्यानं बेस्टचं चलो अॅप डाऊनलोड करणाऱ्या प्रवाशांना ठाणे–बीकेसी दरम्यान पहिल्या पाच फेऱ्या 100 रुपयांत प्रवास करता येणार असून वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पहिल्या 5 फेऱ्यांचा प्रवास 10 रुपयांत करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, प्रवासी ज्या ठिकाणांहून तिकीट बुक करणार त्या ठिकाणांहून प्रवाशाला प्रवास करता येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे.



हेही वाचा

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ ची चाचणी यशस्वी, सेवा लवकर सुरू होण्याची शक्यता

मुंबईकरांनो लक्ष द्या! G-20 शिखर संमेलनासाठी वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा