Advertisement

मुंबईकरांनो लक्ष द्या! G-20 शिखर संमेलनासाठी वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद

आजपासून (सोमवार) 16 डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे काही रस्ते बंद करण्यात आले आहेत पण पर्यायी मार्ग देखील सुचवण्यात आले आहेत.

मुंबईकरांनो लक्ष द्या! G-20 शिखर संमेलनासाठी वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद
SHARES

G20 परिषदेच्या (G-20 summit meet) पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic police) दक्षिण मुंबई (South mumbai) आणि पश्चिम उपनगरातील (western suburbs) अनेक मार्गांवर नवीन वाहतूक निर्बंध जाहीर केले आहेत. आजपासून (सोमवार) 16 डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. कारण या कालावधीत G20 सदस्य भेट देणार आहेत, असे अधिसूचनेत नमूद केले आहे. या सर्व बंद मार्गांमध्ये आपत्कालीन वाहनं अपवाद आहेत.


दक्षिण मुंबईतील वाहतुकीवर परिणाम

दक्षिण-मुंबई (South mumbai) भागात 13 डिसेंबर, मंगळवारी, सदस्य कुलाबा इथल्या हॉटेल ताज पॅलेसला भेट देणार आहेत, कारण छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, पी. रामचंदानी मार्ग, बीके बोमन बेहराम मार्ग, आदम स्ट्रीट आणि महाकवी भूषण मार्गावर वाहतूक कोंडी होऊ शकते.

'हे' रस्ते बंद

  • रिगल जंक्शनच्या जंक्शनपासून छत्रपती शिवाजी महाराज मार्गाचा भाग उत्तरेकडील आणि दक्षिणेकडे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असेल.
  • बोमन बेहराम रोड जंक्शन आणि महाकवी भूषण मार्ग जंक्शन दरम्यानचा आदम स्ट्रीट (इलेक्ट्रिक पोल क्र. AS-5) हा वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असणार आहे. फक्त आपतकालीन वाहनांना परवानगी असेल.
  • मंडलिक स्ट्रीट ते बोमन बेहराम रोड देखील वाहतुकीसाठी बंद असले.
  • चौथा बंद मार्ग म्हणजे शहीद भगतसिंग मार्ग ते महाकवी भूषण मार्ग जंक्शन असा आहे.

पर्यायी मार्ग कोणते?

  • रीगल सर्कल ते दक्षिणेकडील - महाकवी भूषण मार्ग - ताज पॅलेस - बोमन बेहराम रोड - अल्वा चौक - इलेक्ट्रीक हाउस - एसबीएस रोड
  • चौथा बंद मार्ग म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी क्लब (रेडिओ क्लब) ते अॅडम स्ट्रीट जंक्शन – आणि पर्यायी मार्ग आझमी रोड – भिड भंजन मंदिर – एसबीएस रोड आहे.

पश्चिम उपनगरातील वाहतुकीवर परिणाम

पश्चिम उपनगरात - वाकोला वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रात, जिथे G-20 सदस्यांचे आगमन आणि निर्गमन, निवासस्थान आणि बैठकीचे ठिकाण अपेक्षित आहे, हॉटेल ग्रँड हयात, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), पोलिसांनी जाहीर केले आहे की, प्रवेश आणि नो-पार्किंगचे निर्बंध सोमवार 12 मध्यरात्री ते 16 डिसेंबर ते 4 वाजेपर्यंत असतील.

'हे' रस्ते बंद

  • हनुमान मंदिर, नेहरू रोड ते वाकोला पाईप लाईन रोड ते हॉटेल ग्रँड हयात कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ‘नो एन्ट्री’ आणि ‘नो पार्किंग’ असेल.

पर्यायी मार्ग कोणते?

  • कलिना जंक्शनवरून उजवे वळण घेऊन आंबेडकर जंक्शन किंवा हंसभुगरा रोडकडे जाण्याचा पर्यायी मार्ग आहे.
  • त्याचप्रमाणे, जुन्या C.S.T. रोडवरून हॉटेल ग्रँड हयात रोडकडे हॉटेल ग्रँड हयातकडे येणारी वाहने – जी हंसभुग्रा जंक्शन येथून उजवीकडे जातील आणि वाकोला जंक्शनमार्गे नेहरू रोड, सांताक्रूझ स्टेशन किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे जातील.
  • नेहरू रोड येथील पॅटक कॉलेज जंक्शनकडून हॉटेल ग्रँड हयात रोड (छत्रपती शिवाजी नगर रोड) कडून हॉटेल ग्रँड हयातकडे येणाऱ्या वाहनांनी मिलिटरी जंक्शन येथून उजवीकडे कलिना जंक्शनने जावे आणि आंबेडकर जंक्शन किंवा हंसभुग्रा रोडकडे जावे.



हेही वाचा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ट्राफिकची समस्या सुटणार, पुढच्या वर्षी पूल होणार खुला

नवी मुंबईचा होणार कायापालट, २०२३ स्वच्छता सर्वेक्षणासाठी तयारी जोमात

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा